शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण उत्पादनास चालना देणार

By admin | Updated: February 19, 2015 01:29 IST

संरक्षण उत्पादने आयात करणारा देश ही ओळख मिटवायची असेल तर देशातील संरक्षण उत्पादन दुप्पट केले पाहिजे,

बंगळुरू : संरक्षण उत्पादने आयात करणारा देश ही ओळख मिटवायची असेल तर देशातील संरक्षण उत्पादन दुप्पट केले पाहिजे, असे सांगत या उद्योगाला चालना देण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिली़ केवळ विक्रेते म्हणून नाही तर धोरण भागीदार म्हणून भारतात या, असे आवाहन विदेशी गुंतवणूकदारांना त्यांनी केले़ १० व्या ‘एअरो इंडिया एक्स्पो’च्या उद्घाटप्रसंगी मोदी बोलत होते़ देशासमोर सुरक्षेचे मोठे आव्हान आहे आणि याला तोंड देण्यासाठी अत्याधुनिक संरक्षण उपकरणे आणि सैन्य दलांच्या आधुनिकीकरणाची गरज आहे़ अशा स्थितीत संरक्षण उत्पादने आयात करणारा सर्वांत मोठा देश बनण्याऐवजी भारतातील संरक्षण उत्पादन दुप्पट करणे, हे आपले लक्ष्य असले पाहिजे, असे मोदी म्हणाले़देशातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योगांचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची ग्वाही देत, मोदी पुढे म्हणाले की, संरक्षण क्षेत्रातही स्वत:च्या धोरणांसह उतरण्याचे भारताचे लक्ष्य आहे़ भारतात संरक्षण उत्पादन उद्योगाला स्पष्टपणे प्राधान्य देण्यात येईल़मोठ्या उद्योगात खासगी क्षेत्राच्या भूमिकेचा विस्तार करण्याचे भारताचे प्रयत्न यामागे आहेत़ सर्व उद्योगांना समान संधी उपलब्ध करून देणे हे भारताचे लक्ष्य आहे, असेही मोदी म्हणाले़ भारत संरक्षण क्षेत्रातील आपल्या गरजेनुसार सुमारे ६० टक्के उत्पादने आयात करतो़ एका पाहणीनुसार, संरक्षण उपकरणांची आयात २० ते २५ टक्के कमी केल्यास भारत प्रत्यक्ष १ लाख ते १ लाख २० हजार कुशल रोजगार निर्मिती करू शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले़ बंगळुरूमध्ये बुधवारी उद्घाटन झालेला एअरो इंडिया एक्स्पो आतापर्यंतचा आशियातील सर्वांत मोठा एअरो इंडिया एक्स्पो आहे़ नऊ देशांचे संरक्षणमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत़ याशिवाय देश-विदेशातील वरिष्ठ अधिकारी आणि शेकडो उद्योगपती यात सहभागी झाले आहेत़ अनेक देशांचे ५४ मंत्रिस्तरीय आणि अन्य उच्चस्तरीय शिष्टमंडळांसह ६०० पेक्षा अधिक कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत़ यात २९५ भारतीय आणि ३२८ विदेशी कंपन्यांचा समावेश आहे़ अमेरिकेच्या सर्वाधिक ६४ कंपन्यांनी यात भाग घेतला आहे़ यासंदर्भात फ्रान्स दुसऱ्या क्रमाकांवर आहे़ फ्रान्सच्या ४८, रशियाच्या ४१, इस्रायलच्या २५ आणि जर्मनीच्या १७ कंपन्या एअर शो एक्स्पोमध्ये सहभागी आहेत़अन्य देशांकडून संरक्षण उपकरणे आयात करण्यावर भारत हजारो अब्ज डॉलर्स खर्च करतो़ ही आयात घटवून देशातील संरक्षण उद्योगांना लक्ष्य करणे हे आता भारताचे लक्ष्य आहे़ सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाचा हाच मुख्य केंद्रबिंदू आहे़-नरेंद्र मोदी, पंतप्रधान