कांद्यांच्या किमतीमुळे फक्त अडते झाले श्रीमंत: प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 02:49 AM2019-12-12T02:49:32+5:302019-12-12T02:50:17+5:30

निर्मला सीतारामन यांची धोरणे जबाबदार

Priyanka Gandhi has criticized the BJP government | कांद्यांच्या किमतीमुळे फक्त अडते झाले श्रीमंत: प्रियांका गांधी

कांद्यांच्या किमतीमुळे फक्त अडते झाले श्रीमंत: प्रियांका गांधी

Next

नवी दिल्ली : मी कांदे खात नाही, असे विधान करणाऱ्या केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दिवाळखोर धोरणांमुळेच कांद्याचे भाव गगनाला भिडले असून, त्यामध्ये अडत्यांचे उखळ पांढरे झाले आहे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे.

मी कांदा व लसूण फार खात नाही, असे विधान निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यात लोकसभेत केले होते. त्याबद्दल त्यांना टोला लगावताना प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, निर्मला सीतारामन यांचा कांदे, लसूण या गोष्टींशी फार संबंध येत नाही हे ऐकून बरे वाटले; पण सीतारामन या स्वत:पुरत्या नव्हे तर साºया देशाच्या अर्थमंत्री आहेत. कांदा, लसूण यांच्या किमती भरमसाठ वाढल्याने सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. या समस्येवर तोडगा काढणे हे वित्तमंत्री म्हणून सीतारामन यांचे कर्तव्य आहे.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, कांद्याचे अमाप पीक घेतले तेव्हा शेतकऱ्याला प्रतिकिलो दोन किंवा आठ रुपये इतकाच दर देण्यात आला.
सर्वसामान्यांना रडवत आहे.

प्रियांका गांधी यांनी सांगितले की, अयोग्य धोरणांमुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कांद्याचे पीकही आता कमी घेतले जात आहे. या समस्यांवर निर्मला सीतारामन यांनी वित्तमंत्री या नात्याने कोणताही तोडगा काढला नाही. शेतकऱ्यांंच्या पदरी काहीही पडले नाही. आता कांदा लोकांना रडवत आहे. अतिशय महाग दरात कांदे विकत घेण्याची नामुष्की सर्वसामान्य माणसांवर ओढवली आहे.

Web Title: Priyanka Gandhi has criticized the BJP government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.