माझ्या मुलांचे इन्स्टाग्राम अकाउंटही केले हॅक; प्रियांका गांधी यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 06:21 AM2021-12-23T06:21:54+5:302021-12-23T06:23:28+5:30

सरकारला काही काम आहे की नाही, असा खोचक सवाल प्रियांका गांधी यांनी केला.

priyanka gandhi allegation that my children Instagram account was also hacked | माझ्या मुलांचे इन्स्टाग्राम अकाउंटही केले हॅक; प्रियांका गांधी यांचा आरोप 

माझ्या मुलांचे इन्स्टाग्राम अकाउंटही केले हॅक; प्रियांका गांधी यांचा आरोप 

Next

लखनौ :  माझ्या मुलांचे इन्स्टाग्राम अकाऊंटसही हॅक करण्यात आले आहेत, असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला. काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात मंगळवारी पत्रकारांनी त्यांना सरकारविरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप करत असल्याच्या आरोपांबाबाबत विचारले असता, त्या  म्हणाल्या की,  फोन टॅपिंग सोडा... माझ्या मुलांचे इन्स्टाग्राम अकाऊंटसही हॅक करण्यात आले.  सरकारला काही काम आहे की नाही? असा प्रश्नही त्यांनी केला.

समजावादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दोन दिवसांपूर्वी असा आरोप केला होता की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ माझे फोन टॅप करुन दररोज सांयकाळी माझे फोनवरील संभाषण ऐकतात. प्रियांका गांधी यांनी असा दावा केला की, ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ या माझ्या प्रचार मोहिमेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही महिलांसाठी काम करावे लागत आहे.  महिला शक्तीपुढे पंतप्रधान झुकले. उत्तर प्रदेशातील महिलांचा हा विजय आहे.
 

Web Title: priyanka gandhi allegation that my children Instagram account was also hacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.