शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

"... म्हणूनच भाजपा प्रेम स्वीकारत नाही", राहुल गांधींच्या फ्लाइंग किसवरून प्रियंका चतुर्वेदींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 17:34 IST

Flying Kiss Row : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या फ्लाइंग किसवरून चांगलेच राजकारण तापले आहे.

Parliament Monsoon Session । नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या फ्लाइंग किसवरून चांगलेच राजकारण तापले आहे. भाजपाच्या महिला खासदारांनी बुधवारी राहुल गांधी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सभापतींकडे केली. राहुल यांनी सभागृहात भाजपा खासदाराला फ्लाइंग किस केला असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपाने केला आहे. यावरून आता राजकारण तापले असून विरोधी पक्षाच्या खासदारांनी भाजपाला फटकारले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी गांधी यांच्या त्या कृत्याचा दाखला देत भाजपाला लक्ष्य केले. फ्लाइंग किसवेळी घडलेला प्रसंग सांगताना त्या म्हणाल्या, "मी तिथे व्हिजिटर गॅलरीत होती आणि राहुल गांधींनी तिथून निघताना केवळ प्रेमाचा हावभाव म्हणून हे कृत्य केले. पण, भाजपाला द्वेषाची सवय झाली आहे, म्हणूनच ते हे प्रेम स्वीकारत नाहीत."

लोकसभेत फ्लाइंग किसवरून वाद बुधवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान खासदार राहुल गांधी यांनी भाषण करून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भाषण करताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, राहुल गांधी सभागृहाबाहेर पडले. यानंतर स्मृती इराणी म्हणाल्या की, आज ज्यांना माझ्याआधी बोलण्याचा अधिकार देण्यात आला होता त्यांनी (राहुल गांधी) निघताना अशोभनीय वर्तन केले. संसदेतील महिला सदस्यांसमोर फ्लाइंग किस देणारी व्यक्ती ही स्त्रीद्वेषीच असू शकते.

दरम्यान, स्मृती इराणी यांच्या या आरोपानंतर सभागृहातील वातावरण तापले. भाजपाच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या सभागृहात भाषणादरम्यान असभ्य हावभाव केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSmriti Iraniस्मृती इराणीBJPभाजपा