पोहे, गर्लफ्रेंड आणि तुरुंगापासून काही काळ सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 11:22 IST2025-05-27T11:22:16+5:302025-05-27T11:22:16+5:30
एकूण १३ जणांना अटक

पोहे, गर्लफ्रेंड आणि तुरुंगापासून काही काळ सुटका
जयपूर : जयपूर मध्यवर्ती कारागृहातील पाच कैद्यांनी रुग्णालयातील नियमित तपासणीच्या वेळेत पोहे, हॉटेलमध्ये राहणे तसेच पत्नी आणि गर्लफ्रेंडबरोबर घालवलेला वेळ असा एक दिवस साजरा केला. कैद्यांनी तुरुंगाबाहेर काही तास स्वातंत्र्याचा आनंद मिळवण्यासाठी लाच दिल्याचे उघडकीस झाले असून, रविवारी पाच कॉन्स्टेबल, चार कैदी आणि चार नातेवाइकांसह एकूण १३ जणांना अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले.
रफिक बकरी, भंवर लाल, अंकित बन्सल आणि करण गुप्ता या चार कैद्यांनी एसएमएस रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी मंजुरी मिळवली होती. परंतु तपासणीला जाण्याऐवजी, त्यांनी शहरात आरामदायी आणि स्वातंत्र्याचा एक दिवस साजरा करण्यासाठी लाच दिल्याचा आरोप आहे. ही सहल सुमारे २५,००० रुपयांना आयोजित करण्यात आली होती. त्यांच्याबरोबर येणाऱ्या कॉन्स्टेबलना प्रत्येकी ५,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, असे तपासात सहभागी असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले.