हातात बेड्या, पळून जाण्याची संधी; तरीही कैद्याने वाचवले अपघातात जखमी पोलिसांचे प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 03:50 PM2021-07-03T15:50:57+5:302021-07-03T15:52:00+5:30

India News: अपघातात ऑटो उलटल्यानंतर त्याखाली सापडलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची या कैद्याने जीवाची बाजी लावून मुक्तता केली.

The prisoner saved the lives of the injured policemen in the accident | हातात बेड्या, पळून जाण्याची संधी; तरीही कैद्याने वाचवले अपघातात जखमी पोलिसांचे प्राण 

हातात बेड्या, पळून जाण्याची संधी; तरीही कैद्याने वाचवले अपघातात जखमी पोलिसांचे प्राण 

googlenewsNext

पाटणा - बिहारमधील गोपालगंज येथे एका कैद्याने मानवतेचे एक अनोखे उदाहरण प्रस्तुत केले आहे. या कैद्याने अपघातात गंभीर झालेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे प्राण वाचावले. अपघातात ऑटो उलटल्यानंतर त्याखाली सापडलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची या कैद्याने जीवाची बाजी लावून मुक्तता केली. (The prisoner saved the lives of the injured policemen in the accident)

बरौली ठाण्याच्या बढेया ओव्हरब्रिजजवळ नॅशनल हायवे २७ एक ऑटो नियंत्रण सुटून पलटी झाली. या अपघातात दोन पोलीस कर्मचारी ऑटोखाली दबले गेले. त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यासोबत एक कैदीही होता. त्याच्या हातात बेड्या होत्या. दरम्यान. या कैद्याने त्याच परिस्थितीत दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना अपघातग्रस्त रिक्षा बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केले. त्याला एकट्याला मदत करणे शक्य झाले नाही, तेव्हा त्याने आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलावून घेतले. दरम्यान, या अपघातात हा कैदीही गंभीर जखमी झालेला होता.

दरम्यान, हा कैदी घटनास्थळावरून फरार होण्याऐवजी पोलिसांची मदत करून त्यांची सुटका करण्यामध्ये गुंतला. त्याने स्थानिकांच्या मदतीने जखमींनी रुग्णालयात नेले. आता रुग्णालयामध्ये जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत. या पोलिसांबरोबरच अपघातात जखमी झालेल्या कैद्यावर गोपालगंजमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा कैदी बनौरा गावातील असून, पोलिसांनी त्यााला दारू तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. या जखमी कैद्याचे नाव उमेश यादव आहे.

याबाबत बरौली पोलीस ठाण्याचे असिस्टंट सब इन्स्पेक्टर रामनरेश सिंह यांनी आज तकशी बोलताना सांगितले की, पोलिसांचे पथक गस्तीवर गेले होते. तेव्हाच वैकुंठपूर पोलीस ठाण्याचे दोन पोलीस जखमी झाल्याचे तसेच त्यांच्यासोबत एक कैदीही जखमी झाल्याचे वृत्त मिळाले. त्यानंतर या तिघांना गोपालगंजमधील सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे पोलीस कैद्याला कोर्टात हजर करण्यासाठी जात होते. तेव्हा ऑटोचे स्टेअरिंग बिघडून ऑटो पलटली. आता तीनही जखमींवर उपचार सुरू आहेत.  

Web Title: The prisoner saved the lives of the injured policemen in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.