'रुपया मजबूत करण्यासाठी नोटांवर देवी लक्ष्मीचा फोटो छापावा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 21:13 IST2020-01-15T21:12:15+5:302020-01-15T21:13:02+5:30
देशातील चलनी नोटांवर माता लक्ष्मीचा फोटो छापल्यास आंतराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपया मजबूत होईल

'रुपया मजबूत करण्यासाठी नोटांवर देवी लक्ष्मीचा फोटो छापावा'
नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा अजब-गजब विधान केले आहे. देशाची खालावेलली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी स्वांमींनी भयंकर असा उपाय सुचवला आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांची जी घसरण सुरू आहे. ती रोखण्यासाठी तसेच भारतीय रुपयांना मजबूत करायचे असेल तर भारतीय नोटांवर लक्ष्मीचा फोटो लावण्यात यावा, असे स्वामींनी म्हटले आहे.
देशातील चलनी नोटांवर माता लक्ष्मीचा फोटो छापल्यास आंतराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपया मजबूत होईल, असा दावाही सुब्रमण्यम स्वामींनी केला आहे. स्वामींच्या या दाव्यावर आता अर्थतज्ञांकडून काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
इंडोनेशियात नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो आहे, या प्रश्नावर सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देऊ शकतात. नोटावर गणपती असल्याने अनेक संकट दूर करतात. त्यामुळे मला वाटते की, भारतीय नोटांवरही देवी लक्ष्मी यांचा फोटो असायला हवा, असे विधान स्वामींनी केले आहे. मध्य प्रदेशमधील खंडवा येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला कार्यक्रमात त्यांनी हे अर्थव्यवस्थेला मजुबती देणारे निरीक्षण नोंदवले आहे.
दरम्यान, गत काही काळापासून आर्थिक आघाडीवर एकामागोमाग एक झटके सहन करीत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारला आणखी एक तगडा झटका बसला आहे. जागतिक बँकेने बुधवारी ‘जागतिक आर्थिक संभावना’ या शीर्षकाचा अहवाल जारी केला. त्यामध्ये 2019-20 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर पाच टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक बँकेने यापूर्वी भारताचीअर्थव्यवस्था 2019-20 मध्ये सहा टक्के दराने वाढेल, असा अंदाज व्यक्त केला होता, हे उल्लेखनीय आहे.