मुख्याध्यापकाचे शाळेतच अश्लील चाळे, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 19:46 IST2019-08-26T19:45:52+5:302019-08-26T19:46:41+5:30
माध्यमिक हायस्कूल शाळेतील मुख्याध्यापकाच्या या अश्लील हरकतींमुळे शाळेतील शिक्षकवर्ग आणि कर्मचारी त्रस्त होते.

मुख्याध्यापकाचे शाळेतच अश्लील चाळे, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
होशियारपूरा - सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाळेतील मुख्याध्यापक 2 महिला शिक्षकांसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. पंजाबच्या होशियारपुरा, तलवाड येथील सरकारी शाळेतील शिक्षकांचा हा व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, शिक्षण विभागाने आपल्याकडे कुठलिही तक्रार आली नसल्याचे म्हटले आहे. पण, व्हिडीओ किंवा तक्रार आल्यास संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात येईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
माध्यमिक हायस्कूल शाळेतील मुख्याध्यापकाच्या या अश्लील हरकतींमुळे शाळेतील शिक्षकवर्ग आणि कर्मचारी त्रस्त होते. त्यामुळेच, अज्ञात व्यक्तीने मुख्याध्यापकाच्या खोलीत छुपा कॅमेरा लावून हा व्हिडीओ बनवला. त्यानंतर, हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून तो आता व्हायरल झाला आहे. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रतिक्रिया देताना, आरोप फेटाळले आहेत. तसेच, कुणीतरी माझी प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने हा व्हिडीओ बनविल्याचे म्हटले आहे. मात्र, गावच्या सरपंचांनी हे प्रकरण गंभीरतेने घेत, शाळेच्या मुख्याध्यापकांची तात्काळ बदली केली आहे.