हरीश गुप्ता, नवी दिल्ली एनसीइआरटीच्या पाठ्यपुस्तकात न्यायव्यवस्थेवर आधारित वादग्रस्त धडा समाविष्ट केल्याबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरुवारी दिलगिरी व्यक्त केली. भविष्यात अशा चुका होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच दिलगिरी व्यक्त करण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधान यांना दिल्याचे कळते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. तरीदेखील त्यांनी या प्रकरणाच्या सर्व बाजू जाणून घेतल्या. वादग्रस्त धडा समाविष्ट करण्याची कृती कोणी केली, हे शोधले पाहिजे, असेही त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना आवर्जुन सांगितले.
त्यानंतर प्रधान यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही न्यायालयाचा आदर करतो. या यंत्रणेचा अवमान करण्याचा केंद्र सरकारचा इरादा नव्हता. पुस्तक वादाबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात येईल. हा धडा समाविष्ट करण्याच्या कृतीस जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या प्रकारामुळे संतप्त होत न्यायालयाने आठवीच्या पाठ्यपुस्तकावर संपूर्ण बंदी आणली आहे.
यापूर्वी एका नियमाने झाला होता वाद
एनसीइआरटीचे वादग्रस्त पुस्तक ही केंद्रीय शिक्षण खात्याच्या कारभारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज झाल्याची दुसरी महत्त्वाची घटना आहे. यापूर्वी यूजीसीच्या प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन, २०२६ या नियमामुळे वाद निर्माण झाला होता.
या नियमात एससी, एसटी, ओबीसी यांच्यावरच अधिक लक्ष केंद्रित केले असून, खुल्या वर्गातील व्यक्तींच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा समज पसरला. या नियमाचे शिक्षण मंत्रालयाने समर्थन केले. नंतर यात पंतप्रधानांना हस्तक्षेप करावा लागला.
Web Summary : PM Modi ordered an inquiry after a controversial NCERT chapter sparked outrage. Education Minister Pradhan apologized, promising future corrections and action against those responsible. The court banned the eighth-grade textbook due to the issue.
Web Summary : विवादास्पद एनसीईआरटी अध्याय पर पीएम मोदी ने जांच के आदेश दिए। शिक्षा मंत्री प्रधान ने माफी मांगी, भविष्य में सुधार और जिम्मेदार लोगों के खिलाफ कार्रवाई का वादा किया। अदालत ने इस मुद्दे के कारण आठवीं कक्षा की पाठ्यपुस्तक पर प्रतिबंध लगा दिया।