पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मायावतींना 'ही' जात सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 17:48 IST2019-05-11T17:48:05+5:302019-05-11T17:48:44+5:30

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यांमध्ये जातीवरून टीकांचे प्रमाण वाढत चालले आहे.

Prime Minister Narendra Modi told his caste to Mayawati | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मायावतींना 'ही' जात सांगितली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मायावतींना 'ही' जात सांगितली

रॉबर्ट्सगंज : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यांमध्ये जातीवरून टीकांचे प्रमाण वाढत चालले आहे. बसपाच्या मायावती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील जातीय टीका सुरुच आहे. खालच्या जातीचे असते तर मोदींना संगाने पंतप्रधानच केले नसते, या मायावतींच्या टीकेवर मोदींनी प्रत्त्युत्तर दिले आहे. देशातील गरिबांची जी जात असेल तीच जात माझी असल्याचे उत्तर मोदी यांनी दिले आहे. 


मोदी यांनी काही भाषणांमध्ये त्यांची जात खालची असल्याने टीका करत असल्याचे आरोप केले होते. यामुळे विरोधकांनीही त्यांना प्रत्युत्तरे दिली होती. मोदी यांची जात जर खालची असती तर संघाने त्यांना कधीच पंतप्रधान बनविले नसते. मोदी राजकीय स्वार्थासाठी जातीचे ढोंग करत असल्याचा आरोप बसापाच्या नेत्या मायावती यांनी केला होता. 


यावर मोदी यांनी पुन्हा टीका केली आहे. आता हे देखिल सुरु केले आहे की मोदींची जात कोणती आहे. मी स्पष्ट करू इच्छितो की माझी जात ही देशातील गरिबांची जी जात आहे तिच आहे, असे ते म्हणाले. 


सरदार वल्लभभाई पटेल जर देशाचे पंतप्रधान असते तर शेतकऱ्यांची स्थिती चांगली असली असती. मात्र, आम्ही पटेलांचा पुतळा उभा केला त्यालाही या लोकांचा विरोधा असल्याची टीका मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे. 

Web Title: Prime Minister Narendra Modi told his caste to Mayawati