शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

Thank you Gujarat! गुजरातमध्ये नवा विक्रम, हिमाचलमध्ये पराभव; नरेंद्र मोदींनी केलं ट्विट, म्हणाले...

By मुकेश चव्हाण | Updated: December 8, 2022 18:02 IST

गुजरात विधानसभेचा निकाल भाजपासाठी ऐतिहासिक असाच ठरला असून भाजपाने सर्व जुने विक्रम मोडून तब्बल १५७ जागांवर विजय मिळवला आहे.

नवी दिल्ली- गुजरात विधानसभेचा निकाल भाजपासाठी ऐतिहासिक असाच ठरला असून भाजपाने सर्व जुने विक्रम मोडून तब्बल १५७ जागांवर विजय मिळवला आहे. मतांच्या टक्केवारीचेही जुने विक्रम मोडत भाजपने तब्बल ५३ टक्के मतं मिळवली आहेत. भाजपाला मिळालेल्या या मोठ्या विजयानंतर राजकीय विश्लेषकांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाही भाजपाला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं नव्हतं. तसेच काँग्रेसला या निवडणुकीत फक्त १६ जागा तर आम आदमी पक्षाला आतापर्यंत केवळ ५ जागांवर विजय मिळवता आला. 

गुजरातमध्ये भाजपाचा विक्रमी विजय; पाहा काँग्रेसच्या दारूण पराभवाची पाच कारणं

हिमाचल प्रदेशात सत्ता कायम राखण्यास भाजपाला अपयश आले. हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीमध्ये सुरुवातीला काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई सुरू होती. मात्र मतमोजणीच्या उत्तरार्धामध्ये काँग्रेसने आपली आघाडी वाढवत नेली. तर भाजपा पिछाडीवर पडत गेला. सध्याच्या कलांनुसार काँग्रेस ४० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा २५ जागांवर आघाडीवर आहे. तर अपक्षांनी ०३ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशात काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. 

गुजरात आणि हिमाचल निवडणुरकीच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत नागरिकांचे आभार मानले आहेत. गुजरातच्या यंदाच्या निवडणुकीत खूप अभूतपुर्व यश मिळाले. या निकालाने मी भारावून गेलो. लोकांनी विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद दिला आणि त्याचवेळी विकासाची ही गती आणखी वेगाने सुरू राहावी, अशी इच्छा व्यक्त केली. मी गुजरातच्या जनशक्तीला नमन करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

हिमाचल प्रदेशातील जनतेने भाजपला दिलेल्या स्नेह आणि समर्थनाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. राज्याच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि येणाऱ्या काळात लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही कार्यरत राहू, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

दरम्यान, २०१७च्या गुजरात निवडणुकीत भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही थोडं दुर्लक्ष झालं होतं. २०१७मध्ये भाजपाला ९९ जागांवर समाधान मानावे लागले. जवळपास १६ जागा भाजपाने गमावल्या होत्या. तर काँग्रेसने मुसंडी मारत ७७ जागांवर विजय मिळवला होता. मात्र यंदा म्हणजेच २०२२च्या निवडणुकीत भाजपासह नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी लक्ष केंद्रीत करत विजयासाठी रणनिती ठरवली होती. तसेच प्रचारात काँग्रेसने नरेंद्र मोदींना रावण असं संबोधलं होतं. त्याचा परिणामही दिसून आला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Himachal Pradeshहिमाचल प्रदेश