शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पंतप्रधान नरेंद्र माेदी ‘ईश्वराचा अवतार’; देशाला याेग्य दिशेने नेणारे युगपुरुष, भाजप खासदारांची स्तुतिसुमने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 06:53 IST

नमग्याल हे लडाखचे लाेकसभा सदस्य आहेत. जम्मू आणि काश्मीरसाठी पुरवणी मागण्यांबाबत झालेल्या चर्चेत त्यांनी माेदींवर काैतुकाचा वर्षाव करताना स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची स्वप्नपूर्ती माेदींकडून हाेत असल्याचा उल्लेख केला. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा ‘ईश्वराचा अवतार’,  ‘युगपुरुष’ असा उल्लेख करून भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी स्तुतिसुमने उधळली आहेत. माेदी देशाला याेग्य दिशेने नेत असल्याचे अरुणाचल प्रदेशचे भाजप सदस्य तापीर गाओ यांनी म्हटले, तर  खासदार जमयंग नमग्याल यांनी माेदींचा ‘युगपुरुष’ असा उल्लेख केला आहे. (Prime Minister Narendra Maedi ‘Incarnation of God’; Praise of BJP MPs)नमग्याल हे लडाखचे लाेकसभा सदस्य आहेत. जम्मू आणि काश्मीरसाठी पुरवणी मागण्यांबाबत झालेल्या चर्चेत त्यांनी माेदींवर काैतुकाचा वर्षाव करताना स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची स्वप्नपूर्ती माेदींकडून हाेत असल्याचा उल्लेख केला. इशान्येकडील राज्यांमधील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्यांच्या समस्या साेडविल्याचा उल्लेख करून गाओ यांनी माेदींना ईश्वरीय अवतार असल्याचे म्हटले. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान गाओ म्हणाले, माेदी हे मनुष्य नसून काेणाचातरी अवतार आहेत. ते देशाला याेग्य दिशेने नेत आहेत. अरुणाचल प्रदेश व इशान्येकडील राज्यांमध्ये पायाभूत विकासकामांचा उल्लेख गाओ यांनी यावेळी केला. माेदी सरकारने काेराेना महामारीचा सामना करण्यासाठी केलेल्या उपाययाेजनांचा उल्लेखही गाओ यांनी केला. माेदींच्या नेतृत्वामध्ये भारताकडून १०० हून अधिक देशांना काराेनाच्या लसींचा पुरवठा हाेत आहे. हे निश्चितच काैतुकास्पद असल्याचे गाओ म्हणाले. 

यापूर्वीही उल्लेख -केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये चहा कामगारांच्या कल्याणासाठी १ हजार काेटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यावरून ईशान्येकडील खासदारांनी माेदींचे काैतुक केले. काही दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशचे नगरविकास मंत्री सुरेश भारद्वाज यांनी माेदींचा ‘भगवान शंकराचा अवतार’ म्हणून उल्लेख केला हाेता.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानMember of parliamentखासदारBJPभाजपा