Preventing violent mobs by human chains, Muslim youths rescued the Mandir in Bengaluru | मानवी साखळी करून हिंसक जमावाला रोखले, मुस्लिम तरुणांनी मंदिर वाचवले

मानवी साखळी करून हिंसक जमावाला रोखले, मुस्लिम तरुणांनी मंदिर वाचवले

ठळक मुद्दे बंगळुरूमधील पुलकेशीनगर परिसरात मंगळवारी रात्री सोशल मीडियावरील एका पोस्टवरून जमाव भडकला होताजमावाने आक्रमक होत काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर हल्ला करून मोडतोड केलीजमावाने डीजे हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंदिराच्या दिशेने चाल केलीजागरुक असलेल्या काही मुस्लिम तरुणांनी जमावाला मानवी साखळी करून मंदिराजवळ जाण्यापासून रोखले.

बंगळुरू - सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे काल रात्री बंगळुरूमध्ये दंगल उसळली होती. या दंगतील हिंसक जमाव आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर संबंधित आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जमावाने स्थानिक काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला होता. यादरम्यान,हिंसक जमावाने पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या मंदिराच्या दिशेने चाल केली होती. मात्र काही मुस्लिम तरुणांनी मंदिराच्या आवारात मानवी साखळी करून हिंसक जमावापासून मंदिराचे रक्षण केले.

या घटनेचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. बंगळुरूमधील पुलकेशीनगर परिसरात मंगळवारी रात्री सोशल मीडियावरील एका पोस्टवरून जमाव भडकला होता. त्यांनी आक्रमक होत काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर हल्ला करून मोडतोड केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आमदाराच्या निवास्थानाजवळ मोठ्या संख्येने जमाव जमला होता, त्यांनी मोडतोड केली. हल्लेखोरांनी डीजे हल्ली आणि केजी हल्ली पोलीस ठाणे परिसरातही जोरदार आंदोलन केले. याचदरम्यान, जमावाने डीजे हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंदिराच्या दिशेने चाल केली. मात्र जागरुक असलेल्या काही मुस्लिम तरुणांनी आक्रमक होत असलेल्या जमावाला मानवी साखळी करून मंदिराजवळ जाण्यापासून रोखले.कर्नाटकची राजधानी बंगळुरूत सोशल मीडियावरील एका  पोस्टवरून काल रात्री हिंसाचार झाला. यावेळी काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या घरावर जमावाने हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवरदेखील जमावाने हल्ला केला. यामध्ये 60 पोलीस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आता तब्बल 110 जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. 

बंगळुरू शहराचे पोलीस सहआयुक्त संदीप पाटील यांनी याबाबत माहिती  दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बंगळुरूत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. याशिवाय डी. जे. हल्ली आणि के. जे. हल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या भाच्याच्या सोशल मीडियावरील पोस्टने बंगळुरूत वादंग माजला आहे. नवीन असं वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याला देखील अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.   

इतर महत्त्वाच्या बातम्या

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Preventing violent mobs by human chains, Muslim youths rescued the Mandir in Bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.