Presidential Election: राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; नंतर मागितली माफी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 21:38 IST2022-07-05T21:37:52+5:302022-07-05T21:38:49+5:30
वकील प्रशांत भूषण यांनी मंगळवारी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि RSS प्रमुख मोहन भागवत यांचा बनावट फोटो शेअर केला.

Presidential Election: राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल चुकीचे ट्विट; नंतर मागितली माफी...
नवी दिल्ली: वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. यातच आता त्यांचे एक ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. यात प्रशांत भूषण यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूबद्दल(President Candidate Droupadi Murmu) एक ट्विट केले होते, ज्यामध्ये त्या आरएसएस प्रमुख मोहन भागवत (Bohan Bhagwat) यांच्यासोबत दिसत आहेत. मात्र, या चित्राची तपासणी केली असता, हे चित्र मॉर्फेड असल्याचे समोर आले.
मोहन भागवतांसोबत द्रौपदी मुर्मू?
प्रशांत भूषण यांनी मॉर्फ केलेले चित्र ट्विट केले आणि लिहिले की, 'भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी नागपूर येथील आरएसएस मुख्यालयात मोहन भागवत यांची भेट घेतली. त्या फक्त रबर स्टॅम्प असतील आणि स्वतंत्रपणे काम करू शकणार नाही, यात काही शंका आहे का?' या चित्राची चौकशी केली असता हे चित्र चुकीचे निघाले.
ट्विट डिलीट केले
हा फोटो बनावट असल्याचे कळाल्यानंतर प्रशांत भूषण यांनी ट्विट डिलीट केले. तोपर्यंत त्यांचे ट्विट व्हायरल झाले आणि सोशल मीडिया यूजर्सनी प्रशांत भूषण यांना चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, नंतर प्रशांत भूषण यांनी माफीदेखील मागितली. 'राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासोबतचा फोटो मॉर्फ करण्यात आल्याचे मला कळले आहे. त्यामुळे मी माझे ट्विट डिलीट करत द्रौपदी मुर्मूंची माफी मागतो.'