शहरं
Join us  
Trending Stories
1
१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव
2
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
3
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
4
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
5
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
6
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
7
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण? पटापट चेक करा आजचे दर
8
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर
9
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
10
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
11
दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो! हिरव्या वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर; Video व्हायरल
12
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
13
Sankashti Chaturthi 2024: गणपतीची आरती झाल्यावर आपण जे कवन म्हणतो, ते कुठून आलं? वाचा!
14
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
15
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
16
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
17
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
18
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
19
'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम
20
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

President Address : 'नव्या भारताचा उदय होत आहे', राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशाला संबोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 9:08 PM

'दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु महामारीविरुद्ध मानवतेचा संघर्ष सुरुच आहे. या कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय, पण आपण यातून वर येत आहोत.

नवी दिल्ली :प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले. राष्ट्रपती म्हणाले की, 'हा प्रजासत्ताक दिन देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर वीरांचे स्मरण करण्याचा एक प्रसंग आहे. दोन दिवसांपूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या डिजिटल पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले. आपल्या राज्यघटनेचे स्वरूप सर्वसमावेशक आहे, परंतु स्वातंत्र्य, समानता या मूलभूत गोष्टी त्याच्या प्रस्तावनेत लिहिलेल्या आहेत. मुलभूत हक्क आणि मुलभूत कर्तव्ये देखील राज्यघटनेत महत्त्वाच्या पद्धतीने नमूद केलेली आहेत. या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज एक नवीन भारत उदयास येत आहे. हा एक मजबूत आणि संवेदनशील भारत आहे', असं रामनात कोविंद म्हणाले.

आल्या संबोधनात ते पुढे म्हणाले की, 'स्वच्छता मोहिमेपासून ते कोरोना लसीकरणापर्यंत, सार्वजनिक मोहिमेचे यश हे देशसेवेत देशवासी असलेल्या कर्तव्याचे प्रतिबिंब आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान दिन साजरा केला जातो. 1930 ते 1947 पर्यंत दरवर्षी पूर्ण स्वराज दिन म्हणून साजरा केला जातो आणि तोच दिवस संविधानाचा पूर्ण स्वीकार म्हणून साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाचा उपयोग काही विधायक कामासाठी करायला हवा, असे महात्मा गांधी म्हणाले होते.'

भारतात कोरोनाविरोधात सर्वात मोठी मोहिम'आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करावे आणि देशासह जगाच्या भल्यासाठी कार्य करावे अशी गांधीजींची इच्छा होती. आता दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु साथीच्या रोगाविरुद्ध मानवतेचा संघर्ष सुरूच आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. हा विषाणू नव्या स्वरूपात संकट निर्माण करत आहे. हे एक विलक्षण आव्हान राहिले आहे. आपल्या देशात लोकसंख्येची घनता जास्त आहे आणि सुरुवातीच्या काळात आपल्याकडे पुरेशी संसाधने नव्हती, परंतु अशा वेळीच देशाची क्षमता चमकते. कोरोनाशी लढण्यासाठी आपण विशेष कामगिरी केली आहे आणि आता जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहोत', असं ते म्हणाले.

कोरोना काळात आपण जवळीक अनुभवलीराष्ट्रपती पुढे म्हणाले, या संकटाच्या काळात आपण सर्व देशवासी एका कुटुंबाप्रमाणे जोडलेले आहोत हे आपण सर्वांनी पाहिले आहे. सामाजिक अंतराच्या कठीण काळात आपण सर्वांनी एकमेकांशी जवळीक अनुभवली. आपण एकमेकांवर किती अवलंबून आहोत याची जाणीव झाली आहे. डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिक्स यांनी कठीण परिस्थितीत दीर्घकाळ काम करून, रुग्णांची काळजी घेण्यासाठी जीव धोक्यात घालून मानवतेची सेवा केली. देशातील उपक्रम सुरळीत चालू ठेवण्यासाठी अनेकांनी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध आहेत आणि पुरवठा साखळी विस्कळीत होणार नाही याची खात्री केली आहे.

देशसेवेत योगदान देण्याचे आवाहनते पुढे म्हणाले, महिलांना सैन्यात कमिशन देऊन आणि एनडीएमध्ये मुलींना प्रशिक्षण देऊन देशातील महिलांचे सक्षमीकरणही राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. ते म्हणाले की, आजच्या काळात डॉक्टर, शिपाई किंवा इतर क्षेत्रातील जबाबदारी चोखपणे पार पाडणे हीच देशाची खरी सेवा आहे. देश-विदेशात उच्च स्थान प्राप्त करणाऱ्या भारतीयांनी देशसेवेत अधिक चांगले योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदRepublic Dayप्रजासत्ताक दिन