लोकसभेच्या सर्व जागांसाठी तयारी करा; राहुल गांधी अन् मल्लिकार्जुन खरगेंनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 09:06 IST2023-08-17T09:05:35+5:302023-08-17T09:06:57+5:30

दिल्लीत लोकसभेचे सात मतदारसंघ असून, या सर्व ठिकाणी काँग्रेसने तयारी सुरू करावी, असा संदेश पक्ष नेतृत्वाने प्रदेश शाखेला दिला आहे.

prepare for all lok sabha seats rahul gandhi and mallikarjun kharge reviewed | लोकसभेच्या सर्व जागांसाठी तयारी करा; राहुल गांधी अन् मल्लिकार्जुन खरगेंनी घेतला आढावा

लोकसभेच्या सर्व जागांसाठी तयारी करा; राहुल गांधी अन् मल्लिकार्जुन खरगेंनी घेतला आढावा

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दिल्लीत लोकसभेचे सात मतदारसंघ असून, या सर्व ठिकाणी काँग्रेसने तयारी सुरू करावी, असा संदेश पक्ष नेतृत्वाने प्रदेश शाखेला दिला आहे. आम आदमी पार्टीशी समझोता करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोडावा. योग्यवेळी तो घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीच्या काँग्रेस नेत्यांसमवेत लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. तथापि, आजच्या बैठकीत संदीप दीक्षित यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांच्याशी कोणताही समझोता करू नये. 

विरोधी पक्षांची आघाडी इंडियाच्या पाटणा, बंगळुरूच्या बैठकीत केजरीवाल सहभागी झाले होते. त्यानंतर काँग्रेसने दिल्ली अध्यादेशाच्या मुद्यावर संसदेत आपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, दिल्ली व पंजाबच्या अनेक नेत्यांनी याला विरोध केला होता. परंतु, विरोधी ऐक्याच्या नावावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अरविंद केजरीवाल दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांना सर्व जागांवर तयारी सुरू करण्यास सांगितले असले, तरी काँग्रेस व आप यांच्यात समझोता होणार नाही, असे म्हटले जात आहे.

 

Web Title: prepare for all lok sabha seats rahul gandhi and mallikarjun kharge reviewed