CoronaVirus News : गर्भवती पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच पतीने रुग्णालयातून पळ काढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 15:55 IST2020-07-20T15:52:33+5:302020-07-20T15:55:53+5:30
रुग्णालयातील कर्मचार्यांनी फकरुलला फोन केला तेव्हा त्याने पत्नीला ओळखण्यास नकार दिला.

CoronaVirus News : गर्भवती पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच पतीने रुग्णालयातून पळ काढला
लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने तिला ओळखण्यास नकार दिला. असे सांगण्यात येत आहे की, त्याची पत्नी गर्भवती होती, परंतु वेळेवर शस्त्रक्रिया न झाल्यामुळे मुलाचा आईच्या पोटात मृत्यू झाला. यानंतर, आपल्या पत्नीबरोबर या व्यक्तीचे असे वर्तन पाहून लोकांना आश्चर्य वाटले.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर, लखनऊ येथे राहणारी 24 वर्षीय हिनाचे लग्न फेब्रुवारी 2019 मध्ये चांदन गावचे रहिवासी फकरूलशी झाले होते. ४ जुलै रोजी तिला प्रसूतीसाठी लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी हिनाचा स्वॅब घेतला आणि कोरोना विषाणूची चाचणी केली. यावेळी तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. यानंतर रुग्णालयाच्या कर्मचार्यांनी तिच्या पती फकरुलला त्याविषयी माहिती दिली. हे समजताच पत्नी हिनाला मदत करण्याऐवजी त्याने तिला रुग्णालयात सोडले आणि तेथून पळ काढला.
मीडिया रिपोर्टनुसार, रुग्णालयातील कर्मचार्यांनी फकरुलला फोन केला तेव्हा त्याने पत्नीला ओळखण्यास नकार दिला. यानंतर हिनाच्या वडिलांनी फकरूलच्या क्रमांकावर फोन केला. त्यावेळी तो म्हणाला, कोरोनाची लागण झालेल्या पत्नीशी मला कोणताही संबंध ठेवायचा नाही. यानंतर हिनाची काळजी घेण्यासाठी तिची बहीण पुढे आली आणि त्या दोघींनाही लोकबंधू रुग्णालयात पाठविण्यात आले.
अशा परिस्थितीत शस्त्रक्रियेला उशीर झाल्यामुळे मुलाचा आईच्या उदरात मृत्यू झाला. मात्र, असे असूनही या हिनाने धैर्य गमावले नाही आणि तिने कोरोना विषाणूचा पराभव केला. यादरम्यान, तिला 8 दिवस रुग्णालयात राहावे लागले. आता हिनाने आपल्या पतीविरूद्ध कोर्टात जाण्याची तयारी दर्शविली आहे.
आणखी बातम्या...
CoronaVirus News : धक्कादायक! मल्टीनॅशनल कंपनीत कोरोनाचा विस्फोट, २८८ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह
दूध आंदोलनाला राज्यात सुरुवात, दगडाला अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण
रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा
सरकारी कर्मचार्यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...
५००० तरुणी होणार ‘सायबर सखी’, राज्य महिला आयोगाचा उपक्रम