भांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 11:15 IST2018-09-24T09:35:44+5:302018-09-24T11:15:53+5:30

पतीनं गमावली अर्धी जीभ गमावली

pregnant wife cut husband tongue while doing kiss in delhi | भांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ

भांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ

नवी दिल्ली: दिल्लीतील एका गर्भवती महिलेनं किस करताना जाणूनबुजून पतीची जीभ चावली. यामुळे पतीला त्याची जवळपास अर्धी जीभ गमवावी लागली. दिल्लीतील रनहोला भागात ही घटना घडली. आपला पती चांगला दिसत नाही, अशी भावना गर्भवती महिलेच्या मनात होती. त्यामुळे अनेकदा तिचा पतीसोबत वाद व्हायचा. महिला पतीच्या रुपावर खूश नव्हती, अशी माहिती स्थानिकांनी दिली. 

पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 'शनिवारी रात्री पतीचं पत्नीसोबत भांडण झालं. मात्र त्यानंतर हा वाद मिटला. यानंतर पतीनं पत्नीला किस केलं. त्यावेळी पत्नीनं त्याची जीभ चावली. त्यामुळे पतीला त्याची निम्मी जीभ गमवावी लागली,' असं पोलिसांनी सांगितलं. पत्नीनं जीभ चावल्यानंतर पतीवर सफगरजंग रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र यापुढे पती बोलू शकेल की नाही, याबद्दल डॉक्टरांना शंका वाटत आहे. 

पतीची जीभ चावणाऱ्या महिलेवर भारतीय दंड संहिता 326 (जाणूनबुजून एखाद्या व्यक्तीवर हल्ला करुन गंभीर जखमी करणं) च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला पोलिसांनी अटक केली असून तिला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. दिल्लीत राहणाऱ्या या दोघांचा विवाह 20 नोव्हेंबर 2016 रोजी झाला होता. सध्या महिला 8 महिन्यांची गर्भवती आहे. 
 

Web Title: pregnant wife cut husband tongue while doing kiss in delhi