महाकुंभात पुन्हा मोठी दुर्घटना, गरम हवेचा फुगा फुटल्याने 6 जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 20:37 IST2025-02-04T20:36:32+5:302025-02-04T20:37:39+5:30

Prayagraj Mahakhumbh 2025: भाविकांना घेऊन उडताच गरम हवेचा फुगा फुटला.

Prayagraj Mahakhumbh 2025: Another major accident in Mahakumbh, 6 people seriously injured after hot air balloon bursts | महाकुंभात पुन्हा मोठी दुर्घटना, गरम हवेचा फुगा फुटल्याने 6 जण गंभीर जखमी

महाकुंभात पुन्हा मोठी दुर्घटना, गरम हवेचा फुगा फुटल्याने 6 जण गंभीर जखमी

Mahakhumbh 2025: महाकुंभात सोमवारी आणखी एक दुर्घटना घडली आहे. हेलियम वायूने ​​भरलेला गरम हवेचा फुगा उड्डान घेताच फुटला, ज्यामुळे आत बसलेले 6 भाविक गंभीर जखमी झाले. हा अपघात सेक्टर 20 येथील आखाडा मार्गाजवळ घडला. यातील एका भाविकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सर्व जखमींवर एसआरएन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी वसंत पंचमीच्या स्नानादरम्यान दुपारी ही घटना घडली. सेक्टर 20 मधील आखाडा मार्गाजवळ हेलियम गॅस भरल्यानंतर गरम हवेचा फुगा जमिनीवरुन उडताच मोठा स्पोट झाला. या फुग्याच्या स्फोटामुळे प्रदीप(27), अमन(13), निखिल(16), मयंक(50), ललित(32) आणि शुभम(25) हे जखमी झाले आहेत. या सर्व भाविकांना गंभीर दुखापत झाली आहे.

या अपघातानंतर सर्व जखमींना रुग्णवाहिकेने महाकुंभ उपमध्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने सर्वांना वैद्यकीय महाविद्यालय संचलित स्वरूप राणी नेहरू रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. जखमींमध्ये प्रदीप आणि निखिल ऋषिकेश, अमन हरिद्वार, ललित मध्य प्रदेशातील खरगोन, शुभम इंदूर आणि मयंक हे प्रयागराज येथील आहेत. सुदैवाने गरम हवेचा फुगा उडण्याआधीच फुटला. हा अपघात उंचीवर झाला असता तर घटना मोठी होऊ शकली असती.

 

Web Title: Prayagraj Mahakhumbh 2025: Another major accident in Mahakumbh, 6 people seriously injured after hot air balloon bursts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.