"SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 22:19 IST2025-12-04T22:19:12+5:302025-12-04T22:19:40+5:30
तोगडिया राजस्थानच्या पाली जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, "सरकारने केवळ भारतात राहत असलेल्या ३ कोटी बांगलादेशींना देशाबाहेर काढले, तर 'एसआयआर'ची कोणतीही आवश्यकता राहणार नाही."

"SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या एसआयआर (Systematic Internal Review) अभियानावर मोठे विधान केले आहे. "सरकारने केवळ एक काम केले, तर 'एसआयआर'ची काही आवश्यकताच नाही. सरकारने फक्त बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढावे," असे प्रविण तोगडीया यांनी म्हटले आहे.
"...तर एसआयआरची काहीही आवश्यकता उरणार नाही" -
तोगडिया राजस्थानच्या पाली जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, "सरकारने केवळ भारतात राहत असलेल्या ३ कोटी बांगलादेशींना देशाबाहेर काढले, तर 'एसआयआर'ची कोणतीही आवश्यकता राहणार नाही."
"एसआयआरचे काम चुकीचे नाही..." -
येथे माध्यमांशी बोलताना तोगडिया म्हणाले, "मतदार याद्यांच्या 'एसआयआर'चे काम चुकीचे नाही. त्यांच्या मते, या संदर्भात दोन गोष्टी निश्चितपणे व्हायला हव्यात. एक म्हणजे, देशात राहणाऱ्या कोणत्याही वैध नागरिकाचे नाव मतदार यादीतून बाहेर होऊ नेये आणि दुसरे म्हणजे, कोणत्याही बांगलादेशीचे नाव देशाच्या मतदार यादीत कदापी येता कामा नये.
शिक्षण स्वस्त करणे आणि शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज देण्यासाठी काम करावे लागेल -
सोमनाथ मंदिर भटवाडा येथे आयोजित स्वागत समारंभात तोगडिया यांनी बेरोजगार तरुण, शेतकरी आणि शिक्षण व्यवस्थेवरही भाष्य केले. ते म्हणाले, "तरुणांना रोजगार देणे, शिक्षण स्वस्त करणे आणि शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज देण्यासाठी गांभीर्याने काम व्हायला हवे. राष्ट्रहितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील."
कार्यक्रमादरम्यान तोगडिया यांनी लोकांना प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन केले आणि गो-रक्षेचा संकल्प दिला. याच बरोबर, सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी एकत्र येऊन राष्ट्रहितासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे आवाहनही केले.