शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर यांच्या 'त्या' 4 भविष्यवाणी, ज्या पूर्णपणे चुकीच्या ठरल्या; विचारलेल्या प्रश्नावर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 09:52 IST

विशेष म्हणजे, यावेळी केवळ एक्झिट पोलच नव्हे, तर अनेक राजकीय विश्लेषकांचे अंदाजही साफ चुकीचे ठरले. यामुळे आता या राजकीय विश्लेषकांवरच प्रश्न उपस्थित होत आहे.

देशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे. याच बरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, यावेळचे बहुतांश एक्झिट पोल चुकीचे ठरले. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपला 350 ते 400 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात भाजपला केवळ 240 जागाच मिळाल्या. भाजप साठी 2014 आणि 2019 च्या तुलनेत ही सर्वात खराब कामगिरी राहिली. विशेष म्हणजे, यावेळी केवळ एक्झिट पोलच नव्हे, तर अनेक राजकीय विश्लेषकांचे अंदाजही साफ चुकीचे ठरले. यामुळे आता या राजकीय विश्लेषकांवरच प्रश्न उपस्थित होत आहे. यातच एक नाव म्हणजे, निवडणूक रणनितीकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर...

प्रशांत किशोर यांनी नुकत्याच झालेल्या या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेले अनेक दावे चुकीचे ठरले आहेत. त्यांनी निवडणूक निकालानंतर एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांना लोकसभा निवडणुकीसंदर्भात केलेल्या दाव्यांसंदर्भात अथवा भविष्यवाणीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. 

मुलाखतीत प्रशांत किशोर यांना काय विचारण्यात आलं? -- आपण म्हणाला होतात की भाजप 2019 सारखीच कामगिरी करेल आणि 2019 प्रमाणेच 303 अथवा त्याहून अधिक जागा मिळवेल, मात्र असे झाले नाही?- आपण दावा केला होता की, काँग्रेसला 100 हून कमी जागा मिळतील. मात्र असे झाले नाही?- आपण म्हणाला होतात की, पश्चिम बंगालमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. मात्र असेही घडले नही? - आपण म्हणाला होतात की, राजस्थान आणि महाराष्ट्रात भाजपला फारसे नुकसान होणार नाही, जे होईल ते भाजप दक्षिणेतून भरून काढेल. हेही खरे ठरले नही?

अशा प्रश्नांना उत्तर देताना प्रशांत किशोर म्हणाले, ठीक आहे... यात इगोचे काही कारण नाही. कुणाचेही अंदाज चुकीचे ठरू शकतात. या निवडणुकीत अखिलेश यादव हिरो ठरले आहेत. मात्र, गेल्या निवडणुकीत त्यांनी 400 जागा मिळतील असा दावा केला होता, मात्र त्यांना केवळ 125 जागा मिळाल्या. याचा अर्थ त्यांची राजकीय समज कमी झाली असा होत नाही. अमित शहा यांनी बंगाल विधानसभा निवडणुकीत 200 जागा जिंकल्याचा दावा केला होता. मात्र, ते खरे ठरले नाही. याचा अर्थ त्यांना राजकीय समज नाही असा होत नाही.

याशिवाय, राहुल गांधी मध्यप्रदेशात म्हणाले होते, आमचे सरकार बहुमताने येत आहे. मात्र तेथील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. याचा अर्थ त्यांना कळत नाही असे नाही. या निवडणुकीसंदर्भात मी म्हणेन की, होय माझे आकडे चुकीचे ठरले आहेत. पण, भाजपला केवळ 180 जागाच मिळतील, असे ज्यांनी म्हटले होते, त्यांचे दावेही खोटेच ठरले आहेत. तसेच, भाजपचे सरकार येईल, असे म्हणणाऱ्यांचे सरकार आले आहे. मात्र, जागांसंदर्भातील आकडे निश्चितचपणे चुकीचे ठरले आहेत, असेही प्रशांत किशोर म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Prashant Kishoreप्रशांत किशोरElectionनिवडणूक 2024lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाcongressकाँग्रेस