'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 11:29 IST2025-07-29T11:27:54+5:302025-07-29T11:29:54+5:30
Congress MP Praniti Shinde: लोकसभेतील चर्चेदरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हटले.

'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
Congress MP Praniti Shinde: काल, म्हणजेच २८ जुलै २०२५ रोजी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली. यादरम्यान सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी त्याला ऑपरेशन सिंदूरला 'तमाशा' म्हटले. सरकारवर सत्य लपवून फक्त माध्यमांमध्ये प्रशंसा मिळवत आहे. प्रत्यक्षात, ऑपरेशन सिंदूर हा एक 'तमाशा' होता. सरकारने ऑपरेशन सिंदूरमधून देशाला काय फायदा झाला? या कारवाईत किती दहशतवादी पकडले गेले? पाकिस्तानने भारताची किती विमाने पाडली? या कारवाईत झालेल्या चुकांसाठी कोण जबाबदार आहे? असे प्रश्नही त्यांनी यावेळी सरकारला विचारले.
ऑपरेशनमधून काय साध्य झाले?
ऑपरेशन सिंदूरवरुन सोमवारी लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. सरकारच्या वतीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पहलगाम हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरवर सविस्तर माहिती दिली. पण, यादरम्यान विरोधकांनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी तर ऑपरेशन सिंदूरला चक्क 'तमाशा' म्हटले. शिंदे म्हणाल्या की, "सरकार या ऑपरेशनच्या यशाचा दावा करत आहे, मात्र हा फक्त सरकारचा मीडियावरील तमाशा होता."
#WATCH | During the discussion on Operation Sindoor in the House, Congress MP Praniti Shinde says, "... Operation Sindoor was nothing but a 'tamasha' of the government in the media. No one is telling us what was achieved in this Operation. How many terrorists were caught? How… pic.twitter.com/OQiAYkTMer
— ANI (@ANI) July 28, 2025
प्रणिती पुढे म्हणाल्या की, "या ऑपरेशनमध्ये काय साध्य झाले? हे कोणीही सांगत नाही. किती दहशतवादी पकडले गेले? आपण किती लढाऊ विमाने गमावली? यासाठी कोण जबाबदार आहे? याचे उत्तर सरकारने द्यावे. देशात सध्या प्रश्न विचारण्यावर बंदी आहे. सरकार प्रश्न ऐकू इच्छित नाही. जबाबदारीपासून सरकार पळ काढत आहे. मुख्य मुद्द्यांपासून नागरिकांचे लक्ष हटवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी खेळ आणि मनोरंजनात जनतेला व्यस्त ठेवले जाते. यामध्ये आता निवडणूकीपूर्वी दहशतवादी हल्ल्याची भर पडली आहे", असा आरोपही त्यांनी यावळी केला.