शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Prakash Ambedkar : "बसपा अन् चंद्रशेखर आझाद सोडा, संविधानासाठी सपाला मतदान करा", यूपी निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 17:10 IST

Prakash Ambedkar : आपल्याला संविधान वाचवायचे असेल तर आता उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला मतदान करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर प्रदेशातील जनतेला केले आहे. 

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभेच्या (UP Assembly Election 2022) पहिल्या फेरीतील मतदान 10 फेब्रुवारीला होत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत समाजवादी पार्टीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आपल्याला संविधान वाचवायचे असेल तर आता उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला मतदान करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर प्रदेशातील जनतेला केले आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकल्यास संविधान बदलतील. त्यामुळे आम्ही समाजवादी पार्टीला पाठिंबा देत आहोत. संविधान वाचवायचा असेल तर भाजपचा पराभव केला पाहिजे."

'बसपा आणि चंद्रशेखर आझाद याची परिस्थिती दयनीय'आम्ही आंबेडकरवाद्यांना विनंती करतो आता बसपाचा विचार करू नका, चांद्रशेखर आझाद यांचा विचार करू नका, सध्या तुम्ही संविधानाचा विचार करा आणि समाजवादी पार्टीला मतदान करा. सध्या बसपा आणि चंद्रशेखर आझाद या दोघांचीही परिस्थिती दयनीय आहे. आंबेडकरवाद्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. पण, अस्तित्व नंतरही निर्माण करता येते. त्यामुळे सध्या अस्तित्वाचा विचार सोडा आणि मानवतेचा विचार करा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

'रामदास आठवले भाजपचेच'आम्ही मुंबई महानगर पालिकेची निवडणूक गांभीर्याने घेतली असून पूर्ण ताकदीने लढणार आहोत. या निवडणुकीत आमच्यासोबत युती करण्यासाठी सगळ्यांना मार्ग खुले आहेत. फक्त भाजपला आमचे दरवाजे बंद आहेत. रामदास आठवले हे भाजपचेच आहेत आणि त्यांचे चिन्ह देखील कमळच आहे. आम्ही त्यांच्या सोबत युती करणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

पहिल्या टप्प्यातील प्रचार आज संपणार उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज सांयकाळी संपणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 11 जिल्ह्यांतील शामली, मेरठ, मुझफ्फरनगर, बागपत, हापूर, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, बुलंदशहर, मथुरा, आग्रा आणि अलीगढमधील 58 जागांसाठी 10 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10, 14, 20, 23, 27  फेब्रुवारीसह 3 आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSamajwadi Partyसमाजवादी पार्टी