शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

ओमर-मेहबूबा यांच्यात प्रज्ञासिंहांच्या उमेदवारीने जोरदार कलगीतुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 4:51 AM

‘पीडीपी’च्या मेहबूबा मुफ्ती व नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला या दोन नेत्यांमध्येच गुरुवारी आपसात ट्विटरवर कलगीतुरा रंगला.

श्रीनगर : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिल्याबद्दल भाजपवर टीका करण्याच्या नादात गुरुवारी ‘पीडीपी’च्या मेहबूबा मुफ्ती व नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला या दोन नेत्यांमध्येच गुरुवारी आपसात टि्वटरवर कलगीतुरा रंगला.साध्वी प्रज्ञासिंह यांचा नामोल्लेख न करता मुफ्ती यांनी लिहिले की, दहशतवादाच्या खटल्यातील आरोपीला मी उमेदवारी दिली असती तर केवढी संतापाची लाट उसळली असती याची कल्पना करा. या महाभागांच्या (भाजप) लेखी सर्व मुस्लीम दहशतवादी असतात, पण भगव्या माथेफिरूंचा विषय आला की ते म्हणतात, दहशतवादाला धर्म नसतो, दोषी ठरेपर्यंत सर्वच निर्दोष असतात. वास्तविक या टिष्ट्वटमध्ये ओमर अब्दुल्लांचा दुरान्वयानेही संदर्भ नव्हता. पण त्यातील ‘हे महाभाग’चा रोख भाजपकडे आहे हे लक्षात घेऊन त्यांनी टिष्ट्वट करून मेहबूबा यांना टोला लगावला की या महाभागांनी तुम्हाला गचांडी देत सत्तेवरून दूर केले, तोपर्यंत तेच तुमचे मित्र होते. २०१४ मध्ये (दिल्लीत) सत्तेत येण्याआधीही हे महाभाग असेच होते, पण तुम्हाला त्यांची पापे जून २०१८नंतर दिसू लागली. खुर्चीच्या हव्यासाने तुम्हाला त्या वेळी काही दिसत नव्हते.ओमर यांचा हा टोला निमूटपणे न घेता मेहबूबा यांनी प्रतिटोला लगावला की, त्यांचे जम्मू-काश्मीरमधील पहिले मित्र व त्यांच्या सरकारमधील एकेकाळचे केंद्रातील मंत्री या नात्याने त्यांचा खरा रंग तुम्हाला कळायला हवा होता. गुजरात दंगलींनंतर राम विलास पासवान यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला, पण तुम्ही मात्र नाही. ओमर, जरा बदाम खा, स्मरणशक्ती तल्लख होते! (वृत्तसंस्था)>अ‍ॅन्टासिडची गोळी घ्या दोघांमधील हा कलगीतुराआणखीही काही टिष्ट्वटमधून पुढे सुरू राहिला. ओमर अब्दुल्लांनी मेहबूबा यांना यावर खुल्या चर्चेचे आव्हान दिले तर मेहबूबांनी पोटशूळ शमविण्यासाठी अ‍ॅन्टासिडची गोळी घेण्याचा सल्ला ओमर यांना दिला.

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu And Kashmir Lok Sabha Election 2019जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपा