'महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही सरकार पाडू शकतं'; भाजप खासदाराचे मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 14:46 IST2023-01-17T14:46:20+5:302023-01-17T14:46:36+5:30
बिहार सरकारवरुन भाजपचे खासदार प्रदीप कुमार सिंह यांनी मोठं वक्तव्य केले आहे. बिहारमध्येही महाराष्ट्रासारखी उलथा पालथ होऊ शकते आणि सरकार बदलू शकेल, असा दावा त्यांनी केला आहे.

'महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही सरकार पाडू शकतं'; भाजप खासदाराचे मोठं वक्तव्य
बिहार सरकारवरुन भाजपचे खासदार प्रदीप कुमार सिंह यांनी मोठं वक्तव्य केले आहे. बिहारमध्येही महाराष्ट्रासारखी उलथा पालथ होऊ शकते आणि सरकार बदलू शकेल, असा दावा त्यांनी केला आहे. राज्यातील आमदार-खासदारांचा नितीशकुमार यांच्यावरील विश्वास उडाला असून ते आगामी काळात भाजपमध्ये जातील, असंही त्यांनी म्हटले आहे.
बिहारमध्ये आरजेडी आमदार सुधाकर सिंह यांच्या नितीश कुमार आणि बिहारचे मंत्री चंद्रशेखर यादव यांच्या रामचरितमानसवरील वक्तव्यावरुन गदारोळ सुरु आहे, या दरम्यानच भाजप कासदाराच्या या विधानावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 'आमदार-खासदारांचा सरकारवरचा विश्वास उडल्यानंतर महाराष्ट्रात जे काही घडले ते सर्वांसमोर आहे. तसेच बिहारमधील आमदार-खासदारांचा नितीशकुमार यांच्यावरील विश्वास उडाला आहे. आगामी काळात जेडीयूचे सर्व खासदार आणि आमदार भाजपमध्ये सामील होतील, असंही प्रदीप कुमार म्हणाले.
'नितीश कुमार यांनी तेजस्वी हे बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली होती, पण त्यांचे आमदार आणि खासदार हे मान्य करमार नाहीत, असा दावाही त्यांनी केला आहे.
'आमची विचारधारा वेगळी...; वरुण गांधींच्या काँग्रेस प्रवेश चर्चेवर राहुल गांधींच मोठं वक्तव्य
'हे आमदार आणि खासदार चुकीच्या पक्षात गेले असून चुकीच्या लोकांसोबत असल्याचा दावाही त्यांनी केला. याचा परिणाम असा होईल की त्यांचे सर्व खासदार, आमदार त्यांची बाजू सोडून जातील आणि महाराष्ट्रासारखा खेळ बिहारमध्येही होईल यात शंका नाही, असंही ते म्हणाले.
सोमवारी बक्सरमध्ये आंदोलनादरम्यान भाजप नेते परशुराम चतुर्वेदी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी पत्रकार परिषदेत शोक व्यक्त केला आहे.