विमानात Power Bank ने मोबाइल चार्ज करण्यास बंदी; DGCA ने नवे नियम जारी केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:47 IST2026-01-07T12:44:45+5:302026-01-07T12:47:24+5:30
In-Flight Power Bank Ban: डीजीसीएने प्रवासादरम्यान पॉवर बँकद्वारे फोन चार्जिंगवर बंदी घातल्याचे आदेश जारी केले आहेत.

विमानात Power Bank ने मोबाइल चार्ज करण्यास बंदी; DGCA ने नवे नियम जारी केले
मुंबई : काही महिन्यांपूर्वी विमान प्रवासादरम्यान पॉवर बँकद्वारे मोबाइल चार्जिंग करताना आग लागल्याची घटना घडल्या होत्या. याची दखल आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रवासादरम्यान पॉवर बँकद्वारे फोन चार्जिंगवर बंदी घातल्याचे आदेश जारी केले आहेत.
नोव्हेंबर २०२५ मध्ये डीजीसीएने एक अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार, विमानाच्या आत नेऊ शकणाऱ्या हँडबॅगमध्ये पॉवर बँक नेण्यास अनुमती दिली होती. मात्र, ती बॅग विमानामध्ये असलेल्या वरील कप्प्यात ठेवण्यास अनुमती दिली नव्हती. कारण वरील सामानात जर बँटरीमध्ये काही समस्या निर्माण झाली आणि आग लागल्यास धोकादायक ठरू शकते, असे डीजीसीएने नमूद केले होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी विमानात चार्जिंगदरम्यान आग लागली होती. त्यानंतर डीजीसीएने या प्रकरणाचा सखोल तपास करत यापुढे विमानामध्ये पॉवर बँकद्वारे चार्जिंगला बंदी घातली आहे.