काय सांगता? टपाल तिकिटावर छापला चक्क छोटा राजन, मुन्ना बजरंगीचा फोटो 

By कुणाल गवाणकर | Published: December 28, 2020 01:52 PM2020-12-28T13:52:03+5:302020-12-28T13:54:48+5:30

कानपूर टपाल कार्यालयाकडून टपाल तिकिटं जारी

postal stamps of chhota rajan and munna bajrangi released in kanpur | काय सांगता? टपाल तिकिटावर छापला चक्क छोटा राजन, मुन्ना बजरंगीचा फोटो 

काय सांगता? टपाल तिकिटावर छापला चक्क छोटा राजन, मुन्ना बजरंगीचा फोटो 

Next

नवी दिल्ली: टपाल तिकिटावर गुंड, माफियांचे फोटो छापले जाऊ शकतात का, या प्रश्नाचं आदर्श उत्तर नाही असंच देता येईल. पण व्यवस्थेत त्रुटी असल्यास काहीही होऊ शकतं. कानपूरमधील मुख्य टपाल कार्यालयात हेच घडलं आहे. कानपूरच्या मुख्य टपाल कार्यालयातून आंतरराष्ट्रीय डॉन छोटा राजन आणि बागपत तुरुंगातील गँगवॉरमध्ये मारला गेलेला मुन्ना बजरंगी यांचे फोटो असलेली टपाल तिकिटं जारी करण्यात आली आहेत. या तिकिटांच्या मदतीनं पत्र पाठवली जाऊ शकतात.

भारतीय टपाल विभागानं 'माय स्टँप' योजनेच्या अंतर्गत छोटा राजन आणि मुन्ना बजरंगी यांचे फोटो असलेले टपाल तिकिटं छापली आहेत. पाच रुपयाचं मूल्य असलेली छोटा राजनची १२, तर मुन्ना बजरंगीची १२ तिकिटं छापण्यात आली आहेत. टपाल विभागाला यासाठी ६०० रुपयांचं शुल्क मिळालं आहे. तिकिटं छापण्याआधी फोटोंची पडताळणी गरजेची होती. मात्र टपाल विभागानं कोणत्याही प्रकारची पडताळणी केली नाही.




नेमकी काय आहे माय स्टँप योजना?
२०१७ मध्ये मोदी सरकारनं माय स्टँप योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून एखादी व्यक्ती ३०० रुपये शुल्क भरून स्वत:चा किंवा स्वत:च्या कुटुंबीयांचा फोटो टपाल तिकिटावर छापून घेऊ शकते. शुल्क जमा केल्यावर टपाल विभाग १२ तिकिटं जारी करतो. ही तिकिटं इतर टपाल तिकिटांप्रमाणेच असतात. त्यांचा वापर करून तुम्ही देशात कोणालाही पत्र पाठवू शकता.

तिकीट मिळवण्याची प्रक्रिया बरीच मोठी
पोस्टाचं तिकीट तयार करण्याची प्रक्रिया बरीच मोठी आहे. त्यासाठी अर्जदाराला पासपोर्ट आकाराचा फोटो आणि संपूर्ण माहिती द्यावी लागेल. त्याच्याकडून एक अर्ज भरून घेण्यात येतो. हृयात असलेल्या व्यक्तीचं तिकीट छापलं जातं. त्या व्यक्तीला सत्यापित करण्यासाठी स्वत: टपाल कार्यालयात जावं लागतं. याशिवाय स्वत:सोबत फोटो, आधार कार्ड, वाहन परवाना आणि मतदार ओळखपत्र न्यावं लागतं. या सगळ्याची झेरॉक्स जमा करावी लागते. त्यानंतर पडताळणी करून पोस्टाचं तिकीट जारी केलं जातं.

Read in English

Web Title: postal stamps of chhota rajan and munna bajrangi released in kanpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.