Is porn the reason behind the rising in rape cases? Sushil Modi's 'U-turn' on the question | Video: वाढत्या बलात्कारांमागे पॉर्न कारणीभूत आहे का? प्रश्नावर सुशील मोदींचा 'यू टर्न'
Video: वाढत्या बलात्कारांमागे पॉर्न कारणीभूत आहे का? प्रश्नावर सुशील मोदींचा 'यू टर्न'

पटना : देशभरात बलात्काराच्या घटना वाढत चालल्या आहेत. तेलंगाना, उत्तर प्रदेशनंतर बिहारमध्येही बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. यामुळे तेथील राज्यांच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वाढत्या बलात्काराच्या घटनांसाठी पॉर्नला जबाबदार ठरविले आहे. मात्र, त्याच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य करण्याचे टाळले आहे. 


केंद्र सरकारने दीड वर्षांपूर्वी देशात पॉर्न वेबसाईटवर बंदी घातली होती. यामुळे काही प्रमाणात पॉर्न वेबसाईट ब्लॉक झाल्या आहेत. हैदराबादनंतर बिहारच्या बक्सर आणि समस्तीपूरमध्ये बलात्कारानंत पिडीतेला जाळण्याच्या धक्कादायक घटना घडल्या होत्या. तर शुक्रवारी दरभंगामध्ये एका टेम्पो चालकाने पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. यावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनांसाठी पॉर्नला दोष दिला आहे. 


यावर नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले भाजपाचे नेते सुशिल मोदी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर न देताच काढता पाय घेतला. यामुळे मोदींवर टीका होत आहे. 

Web Title: Is porn the reason behind the rising in rape cases? Sushil Modi's 'U-turn' on the question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.