शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

राहुल, सोनिया गांधी यांना मतदान करा, मायावतींचा बसप कार्यकर्त्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 6:18 AM

उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व रायबरेलीमध्ये यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवत असून त्यांना मतदान करण्याचा आदेश बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आपल्या पक्षकार्यकर्त्यांना रविवारी दिला.

लखनौ : उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व रायबरेलीमध्ये यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवत असून त्यांना मतदान करण्याचा आदेश बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आपल्या पक्षकार्यकर्त्यांना रविवारी दिला.लोकसभा निवडणुकांचा पाचवा टप्पा उद्या सोमवारी पार पडणार असून त्यावेळी या दोन्ही ठिकाणीही मतदान होणार आहे. मायावती यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे सप-बसपने आघाडी करताना काँग्रेसला दूर ठेवले. मात्र भाजपला पराभूत करण्यासाठी बसप कार्यकर्ते, समर्थकांनी अमेठी, रायबरेलीमध्ये काँग्रेस उमेदवारांना मतदान करावे. लोकसभा निवडणुकांच्या आतापर्यंत पार पडलेल्या चार टप्प्यांमध्ये जनतेने सप-बसप आघाडीलाच पाठिंबा दिला असून त्यामुळे भाजप अस्वस्थ झाला आहे. सप-बसप आघाडी देशाला केवळ नवा पंतप्रधानच देणार नाही तर उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात राज्य सरकारही स्थापन करणार आहे. अहंकारी राजवटीपासून देशाची लोकसभा निवडणुकांच्या दिवशी म्हणजे २३ मे रोजी मुक्तता होणार आहे.मोदींकडून खोटानाटा प्रचारसप-बसप युती तुटावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप प्रयत्न केल्याचा आरोप मायावती यांनी केला आहे. बसपला अंधारात ठेवून काँग्रेस व सप यांच्या एकत्रित कारवाया सुरू असतात असे पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमधील प्रतापगढच्या प्रचारसभेत म्हणाले होते. त्याला उत्तर देताना मायावती म्हणाल्या की, सप, बसपच्या कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी मोदी खोटानाटा प्रचार करत आहेत. फोडा आणि राज्य करा या नीतीचा त्यांनी वापर चालविला आहे. सप-बसपची युती केवळ लोकसभा निवडणुकांपुरती नाही तर आगामी निवडणुकांतही ती कायम राहणार आहे.

टॅग्स :mayawatiमायावतीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019