शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तू मेला नाहीस तर शाळा लवकर कशी सुटेल... सहावीच्या मुलीने पहिलीतल्या मुलाला भोसकलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 13:44 IST

शाळेत प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आपआपल्या वर्गात जात होते. पहिल्या इयत्तेत शिकणारा हृतिक हा देखील वर्गात जाण्याच्या तयारीत होता. परंतू वर्गात जात असताना मध्येच सातवीत शिकणारी एक मुलगी ह्रतिकजवळ गेली.

लखनऊ: शाळा लवकर सुटावी म्हणून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे हा गंभीर प्रकार घडला आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी  असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. किंग जॉर्ज्स मेडिकल युनिव्हर्सिटीतील ट्रॉमा सेंटरमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत.मंगळवारी ब्राईटलँड इंटर स्कूल या शाळेत प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आपआपल्या वर्गात जात होते. पहिल्या इयत्तेत शिकणारा हृतिक शर्मा हा देखील वर्गात जाण्याच्या तयारीत होता. परंतू वर्गात जात असताना मध्येच सातवीत शिकणारी एक मुलगी ह्रतिकजवळ गेली. तुझं नाव काय, तुला शिक्षकांनी बोलावले आहे, असे सांगत त्या मुलीने ह्रतिकला काही कळायच्या आत त्याच्या तोंडावर हात ठेवून खेचत त्याला शाळेतील स्वच्छता गृहात नेले.  मुलगा ओरडायला लागल्यावर तिने त्याच्या तोंडात कापडाचा बोळा घातला. ओढणीच्या सहाय्याने त्याचे हातपाय बांधले. दरवाजा बंद करुन तिने तीक्ष्ण हत्याराने ह्रतिकच्या पोटावर आणि छातीवर वार करायला सुरूवात केली. रक्तबंबाळ झालेल्या ह्रतिकला बाथरुममध्येच कोंडून ती पळून गेली. ह्रतिकचा आवाज ऐकून शाळेतील काही कर्मचा-यांनी स्वच्छता गृहाचा दरवाजा उघडला. रक्तबंबाळ अवस्थेत ह्रतिक पडला होता. त्याचे हातपाय बांधले होते, तोंडात कापडाचा बोळा कोंबला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची प्रकृती सध्या स्थिर आहे. शाळा प्रशासनाने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती आहे. पण ह्रतिकवर ज्या रुग्णालयात उपचार सुरु होते तिथून ही माहिती प्रसारमाध्यमांना समजली आणि हे प्रकरण उघड झाले. पोलिसांनीही तातडीने याची दखल घेत मुलाचा जबाब घेतला. तसेच शाळा प्रशासनाला नोटीसही बजावली आहे. विद्यार्थिनीचा फोटो पाहून जखमी विद्यार्थ्याने तिची ओळख पटवली आहे.  'बॉयकटवाल्या दीदी'ने टॉयलेटमध्ये आपल्यावर चाकूने हल्ला केल्याचं त्याने सांगितलं. तू मेला नाहीस तर शाळा लवकर कशी सुटेल असं  'बॉयकटवाली दीदी' हल्ला करताना म्हणत होती अशी माहिती शुद्धीवर आल्यानंतर हृतिकने घडल्या प्रकाराबाबत दिली.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrimeगुन्हा