शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

"इतक्या गोळ्या घालेन की घरचे ओळखणार नाहीत"; पेट्रोल पंपावर तरुणीने कर्मचाऱ्याच्या छातीवर रोखले रिव्हॉल्व्हर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 08:22 IST

उत्तर प्रदेशात एका तरुणीने पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यावर पिस्तुल रोखल्याचा प्रकार समोर आला आहे.

UP Crime: गेल्या काही काळापासून समाजातील लोकांकडून वाढत्या संतापामुळे काही चिंताजनक घटना घडल्याचे समोर आलं आहे. संतापाच्या भरात संयम गमावल्यामुळे हत्याकांडासारख्या घटना देखील घडल्या आहेत. अशातच उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणीचा पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या छातीवर रिव्हॉल्व्हर रोखण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ती तरुणी पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्याला धमकावताना दिसत आहे. मात्र हे धमकावणे तरुणीला आणि तिच्या वडिलांना महागात पडलं आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे.

उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये एक तरुणी सीएनजी पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर रिव्हॉल्व्हर रोखताना दिसत आहे. सीएनजी पंपावर कारमधून जाणाऱ्या एका कुटुंबात आणि सीएनजी पंपावरील कर्मचाऱ्यामध्ये झालेल्या वादानंतर हा प्रकार घडला. वादादरम्यान तरुणीने कर्मचाऱ्याच्या छातीवर रिव्हॉल्व्हर रोखली आणि त्याला थेट धमकावले. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारमध्ये प्रवास करणाऱ्या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

बिलग्राम परिसरातील सांडी रोडवर हे पेट्रोल पंप आहे. रविवारी संध्याकाळी ६ वाजता एहसान खान हे त्यांची पत्नी हुस्नबानो आणि मुलगी सुरेश खान उर्फ ​​अरिबा यांच्यासोबत पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी आले होते. सीएनजी भरत असताना कर्मचारी रजनीश कुमार याने त्यांना गाडीतून उतरण्यास सांगितले. पण खान कुटुंबाने नकार दिला. रजनीश कुमारने गाडीत बसून गॅस भरणे धोकादायक असल्याचे सांगितले. तरीही त्यांनी ऐकले नाही. यामुळे कुमारने  सीएनजी भरण्यास नकार दिला. 

एहसान यांच्या कुटुंबाला या गोष्टीचा प्रचंड राग आला. त्यांनी कुमारशी भांडण केले आणि त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कुमारने विरोध केला तेव्हा एहसान खानची मुलगी हातात रिव्हॉल्व्हर घेऊन गाडीतून उतरली. तिने रिव्हॉल्व्हर कुमारच्या छातीवर रोखले. त्यानंतर तिने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणीने इतक्या गोळ्या मारीन की घरचे ओळखू शकणार नाहीत, असं धमकावल्याचा आरोप आहे. हा सगळा गोंधळ पाहून पेट्रोल पंपावरील इतरांना त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा सगळा प्रकार तिथे बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

दरम्यान, रजनीश कुमार याने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एहसान खान त्याची मुलगी आणि पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वडील आणि मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही