up polic uses bollywood superhit movie sholey scene to appeal citizen for not spitting in open during covid 19 | 'गब्बर को किस बात की मिली सजा'; पोलिसांच्या भन्नाट ट्वीटची चर्चा

'गब्बर को किस बात की मिली सजा'; पोलिसांच्या भन्नाट ट्वीटची चर्चा

ठळक मुद्देपोलिसांच्या त्या ट्वीटला मिळाले हजारो लाईक्स

सध्या देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. याव्यतिरिक्त देशात आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणालाही सुरूवात झाली आहे. सरकार आणि स्थानिक प्रशासनही लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत अशातच उत्तर प्रदेशपोलिसांनी कोरोनाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला एक क्लासिक चित्रपट शोलेमधील एका दृश्याची मदत घेतली आहे. 

'गब्बर को किस बात की मिली सजा' असं कॅप्शन देत पोलिसांनी एक क्लिप शेअर केली आहे. यामध्ये अमजद खान यांनी साकारलेलं गब्बर हे पात्र उघड्यात थुंकताना दाखवलं आहे. तर या चित्रपटातील ठाकूर यांची भूमिका साकारणारे संजीव कुमार हे त्याला गळा दाबून पकडताना दाखवण्यात आलं आहे. व्हिडीओच्या अखेरिस एक संदेशही लिहिण्यात आला आहे. 'सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कोविड १९ चा प्रसार वाढू शकतो. हा एक गुन्हा आहे.'सार्वजनिक ठिकाणी  थुंकू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचं हे भन्नाट ट्वीट अनेकांच्या पसंतीस उतरलं आहे. अनेकांनी त्यांच्या क्रिएटिव्हीटीची वाहवा केली आहे. त्यांना या ट्वीटला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि हजारो रिट्वीट्सही मिळाले आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: up polic uses bollywood superhit movie sholey scene to appeal citizen for not spitting in open during covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.