पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाचा भाजपशी काहीही संबंध नाही, निर्मात्यांचे निवडणूक आयोगाला उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 01:05 IST2019-03-30T01:05:01+5:302019-03-30T01:05:24+5:30

आमचा भाजपशी काहीही संबंध नसून पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट बनविण्यासाठी आमच्या पदरचे पैसे खर्च केले आहेत, असे या चित्रपटाच्या निर्मात्यांनी निवडणूक आयोगाला कळविले आहे.

PM Narendra Modi's film does not have anything to do with BJP, answers to the Election Commission of the producers | पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाचा भाजपशी काहीही संबंध नाही, निर्मात्यांचे निवडणूक आयोगाला उत्तर

पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाचा भाजपशी काहीही संबंध नाही, निर्मात्यांचे निवडणूक आयोगाला उत्तर

नवी दिल्ली : आमचा भाजपशी काहीही संबंध नसून पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट बनविण्यासाठी आमच्या पदरचे पैसे खर्च केले आहेत, असे या चित्रपटाच्या निर्मात्यांनी निवडणूक आयोगाला कळविले आहे.
या चित्रपटाचे ५ एप्रिलला होणारे प्रदर्शन पुढे ढकलावे, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याबद्दल आयोगाने या चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित, संदीप सिंह, मनीष आचार्य, सुरेश ओबेरॉय यांना स्पष्टीकरण मागितले होते. त्यांच्या वतीने वकील हितेश जैन यांनी आयोगाला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, हा एक व्यावसायिक चित्रपट असून एखाद्या राजकीय नेत्यावर चित्रपट बनविला म्हणजे निर्माता त्या पक्षाशी संबंधितच असावा असे गृहीत धरणे योग्य नाही.

Web Title: PM Narendra Modi's film does not have anything to do with BJP, answers to the Election Commission of the producers