Video: लेह दौऱ्यावर पोहोचताच नरेंद्र मोदींनी सर्वात पहिले केले 'हे' महत्वाचे काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 18:50 IST2020-07-03T18:35:42+5:302020-07-03T18:50:59+5:30
भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचा लेह दैरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे.

Video: लेह दौऱ्यावर पोहोचताच नरेंद्र मोदींनी सर्वात पहिले केले 'हे' महत्वाचे काम
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अचानक लेह दौरा करुन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. नरेंद्र मोदींनी लेह लडाख सीमारेषेवर जाऊन देशातील जवानांचे मनोबल वाढविण्याचं काम केलें आहे. तसेच भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचा लेह दैरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे.
नरेंद्र मोदी 11 हजार फुटावर असलेल्या लष्कराच्या नीमू पोस्टवर दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत सीडीएस बिपिन रावत आणि लष्करप्रमुख मुकूंद नरवणेही होते. नरेंद्र मोदी लेहमध्ये पोहचल्यानंतर हेलिकॉप्टरने उतरले आणि थेट लष्करी अधिकाऱ्यांकडे गेले. त्यांनंर नरेंद्र मोदी यांनी LACचा नकाशा आणि सद्य स्थितीची माहिती घेतली.
Earlier visuals of Prime Minister Narendra Modi's arrival in Ladakh, he was later briefed by senior officials in Nimmoo. pic.twitter.com/fDO6qvpMcM
— ANI (@ANI) July 3, 2020
लडाख सीमारेषेवरील भारतीय भूमीवर चीनने अतिक्रमण केल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात भारतीय सैन्यावर चीनने पाठीमागून हल्ला केला. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे 40 हून अधिक जवान मारले गेले. यानंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज थेट लेह गाठत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. यावेळी, मोदींनी सैन्याला संबोधित करत, त्यांना धीर देत देशाची 130 कोटी जनता आपल्यासोबत असल्याचे म्हटलं आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प आपल्या त्याग आणि बलिदानातूनच मजबूत होणार असल्याचे मोदींनी म्हटले.
देशवासियांना देशाच्या जवानांच्या पराक्रमाचा अभिमान आहे. आज मी माझ्या वाणीतून आपला जयघोष करतोय, गलवान घाटीत शहीद झालेल्या देशातील जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून भारतीय जवान आपलं शौर्य दाखवत आहेत. आज प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुगली आहे, देशवासियांनी आपल्यासमोर नतमस्तक केलंय. गलवान खोऱ्यातील नदी, पर्वत, खोऱ्यातील कानाकोपरा देशातील जवानांच्या पराक्रमाची गाथा गात आहे.
देशातील 130 कोटी भारतीयांच्या सन्मानाचा हा पराक्रम आहे, देशासाठी बलिदान देणाऱ्या राष्ट्रभक्तांची ही भूमी आहे. आपण त्याच भारतमातेचे वीर आहात, ज्या भारतमातेने आजपर्यंत हजारो आक्रमकांना चोख प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्र आणि मानवतेच्या प्रगतीसाठी शांतीप्रिय असणे गरजेचं असतं. भारत हा शांतताप्रिय देश आहे, पण कुणी आम्हाला डिवचलं तर, उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत, असे म्हणत थेट सीमारेषेवरुनच चीनला नरेंद्र मोदींनी स्पष्ट संदेश दिला आहे.
#WATCH Prime Minister Narendra Modi briefed by senior officials in Nimmoo, Ladakh pic.twitter.com/uTWaaCwUVL
— ANI (@ANI) July 3, 2020