PM मोदींच्या सभेत काळे कपडे घालून येणाऱ्यांना 'नो एंट्री'; प्रशासनानं उतरवली RSS कार्यकर्त्याची टोपी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 02:25 PM2021-07-15T14:25:09+5:302021-07-15T14:28:26+5:30

आज, वाराणसीतील काशी हिंदू विश्वपीठाच्या आयआयटी खेळाच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. पंतप्रधान मोदींना कुणीही विरोध करू नये, यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली होती.

PM Narendra Modi Varanasi Visit bhu iit ground no entry to black clothed people RSS worker took off his cap | PM मोदींच्या सभेत काळे कपडे घालून येणाऱ्यांना 'नो एंट्री'; प्रशासनानं उतरवली RSS कार्यकर्त्याची टोपी

PM मोदींच्या सभेत काळे कपडे घालून येणाऱ्यांना 'नो एंट्री'; प्रशासनानं उतरवली RSS कार्यकर्त्याची टोपी

Next

वाराणसी- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाराणसी दौऱ्याच्या (Varanasi Visit) पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त केला होता. पंतप्रधान मोदींना ऐकण्यासाठी बीएचयूच्या आयआयटी मैदानावर पोहोचणाऱ्या लोकांना काळे कपडे (Black Cloths) घालूण येण्याची परवानगी नव्हती. एवढेच नाही, तर यावेळी लोकांचा काळ शर्ट आणि आरएसएसच्या (RSS) स्वयंसेवकांची काळी टोपीही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी उतरवली. (PM Narendra Modi Varanasi Visit bhu iit ground no entry to black clothed people RSS worker took off his cap)

आज, वाराणसीतील काशी हिंदू विश्वपीठाच्या आयआयटी खेळाच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. पंतप्रधान मोदींना कुणीही विरोध करू नये, यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली होती. यावेळी, काळे शर्ट अथवा टी-शर्ट घालून येणाऱ्यांचे कपडे काढण्यात आले अथवा त्यांना आत सोडण्यात आले नाही. विशेष म्हणजे काळे मास्कदेखील यावेळी काढायला सांगण्यात आले.

आता उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य, जबरदस्त काम करतायत मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींकडून योगींचं कौतुक

RSS कार्यकर्त्यालाही काढायला सांगितली टोपी -
मोदींच्या सभेसाठी आरएसएसचा एक कार्यकर्ता यूनिफॉर्म आणि काळी टोपी घालून पोहोचला होता. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यालाही टोपी काढायला सांगितली. यानंतरच त्याला सभेच्या ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात आली. काही लोकांना हे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य वाटले. तर काहींना हे अयोग्य वाटले.

 21 आयपीएस आणि 10 हजार जवान सुरक्षेत तैनात - 
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी एनएसजीचे कमांडो आणि एटीएसच्या कमांडोज शिवाय केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांची टीमही आहे. तसेच बाहेर सुरक्षेसाठी सेंट्रल पॅरामिलिट्री फोर्सचे जवानही तैनात आहेत. या व्यवस्थेची जबाबदारी  21 आयपीएस अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. ज्यांच्यासोबत 10 हजारहून अधिक पोलीस आणि पीएसीचे जवान जागो-जागी तैनात आहेत. शहरातील गर्दीच्या ठिकाणीही टॉप फोर्स तैनात करण्यात आला आहे. तसेच ज्या-ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी जाणार आहेत, त्या-त्या ठिकाणी नो फ्लाइंग झोनही तयार करण्यात आला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: PM Narendra Modi Varanasi Visit bhu iit ground no entry to black clothed people RSS worker took off his cap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app