नरेंद्र मोदी नेटीझन्सच्या 'रडार'वर, सोशल मिडीयात पंतप्रधानांच्या त्या विधानाची खिल्ली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 09:25 IST2019-05-13T09:25:06+5:302019-05-13T09:25:37+5:30

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांना सळो की पळो करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सोशल मिडीयात एका वक्तव्यावरुन चांगलेच ट्रोल होऊ लागलेत.

PM Narendra Modi troll in Social Media | नरेंद्र मोदी नेटीझन्सच्या 'रडार'वर, सोशल मिडीयात पंतप्रधानांच्या त्या विधानाची खिल्ली 

नरेंद्र मोदी नेटीझन्सच्या 'रडार'वर, सोशल मिडीयात पंतप्रधानांच्या त्या विधानाची खिल्ली 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांना सळो की पळो करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सोशल मिडीयात एका वक्तव्यावरुन चांगलेच ट्रोल होऊ लागलेत. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राईकच्या दिवशी असणाऱ्या हवामानावर भाष्य केलं. त्या विधानावर नेटीझन्सकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याची सोशल मिडीयात खिल्ली उडवली जात आहे. 

एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलाखतीत म्हणाले होते की, 'बालाकोट एअरस्ट्राईकच्या वेळी अचानक हवामान खराब झाले. त्यामुळे अशा स्थितीत भारतीय वैमानिक पाकिस्तान सीमेत दाखल होतील का यावर संशय होता. त्यातच वैज्ञानिकांनी सर्जिकल स्ट्राईकची तारिख बदलण्यास सांगितले. मात्र माझ्या डोक्यात दोन विषय होते, एक म्हणजे गुप्तता आणि दुसरी म्हणजे आपण काही फार मोठे वैज्ञानिक नाही. मात्र त्यानंतर मी म्हणालो की, एवढ्या मोठ्या प्रमाणात आभाळ आणि पाऊस असेल तर त्याचा आपल्याला लाभही होऊ शकतो. त्यामुळे आपण पाकिस्तानच्या रडारमध्ये दिसणार नाही. या आभाळाचा आपल्याला लाभ होईल, असं आपण सांगितले. त्यामुळे सगळेच द्विधा मनस्थितीत होते. अखेरीस मीच म्हणालो, आभाळ आलेले आहे, चला पुढे जाऊ या...', असं मोदींनी मुलाखतीत सांगितले. 

मात्र पंतप्रधान मोदींनी केलेल्या या विधानामुळे सोशल मिडीयात धुमाकूळ माजला आहे. मोदी यांनी केलेल्या विधानावर सोशल मिडीयात विनोदाचा पाऊस भरला आहे. 
 



 



 



 



 



 



 

 

Web Title: PM Narendra Modi troll in Social Media