PM Narendra Modi met rikshaw puller mangal kewat who invited pm for his daughters marriage | अन् 'त्या' रिक्षा चालकाची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट, म्हणाले...

अन् 'त्या' रिक्षा चालकाची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट, म्हणाले...

ठळक मुद्देरिक्षा चालकाने आपल्या मुलीच्या विवाहाची पत्रिका मोदींना पाठवली होती.नरेंद्र मोदी यांनी रिक्षा चालकाची भेट घेऊन विचारपूस केली आहे. मोदींनी हात जोडून मंगल यांचं स्वागत केलं तसेच आपल्या शेजारी बसवून त्यांची आपुलकीने चौकशी केली.

वाराणसी - वाराणसीतील एका रिक्षा चालकाने आपल्या मुलीच्या विवाहाची पत्रिका मोदींना पाठवली होती. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मुलीला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देणारं एक पत्र पाठवलं. रविवारी (16 फेब्रुवारी) मोदी वाराणसीत होते. त्यावेळी त्यांनी आवर्जून या रिक्षा चालकाची भेट घेऊन विचारपूस केली आहे. मंगल केवट असं या रिक्षा चालकाचं नाव असून ते वाराणसीतील दोमरी या गावात राहतात. हे गाव पंतप्रधान मोदी यांनी दत्तक घेतले आहे. मंगल यांनी मुलीच्या विवाहाची पत्रिका मोदींना पाठविली होती, त्यांनी दिल्लीतील पीएमओ कार्यालयामध्ये जाऊन पत्रिका दिली होती. त्यानंतर मोदींनी त्यांच्या या पत्राला उत्तर देत मुलीला शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान मोदी यांनी मंगल यांच्या मुलीला आणि जावयाला त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा देणारं पत्र पाठवलं होतं. मात्र त्यानंतर नरेंद्र मोदी वाराणसीत आलेले असताना त्यांना मंगल यांची भेट घेतली. मंगल यांना भेटण्यासाठी आमंत्रित केलं. भेटीसाठी ते आलेले असताना पंतप्रधान मोदींनी हात जोडून मंगल यांचं स्वागत केलं तसेच आपल्या शेजारी बसवून त्यांची आपुलकीने चौकशी केली. 'लग्न छान झालं ना?, मुलीला आणि जावयाला सोबत का नाही आणलं?, जावई काय काम करतो?' असे प्रश्न मोदींनी मंगल यांना विचारले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पंतप्रधान मोदींनी मंगल यांच्या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत. '16 फेब्रुवारी रोजी मोदी वाराणसीत आहेत. त्यावेळी त्यांना भेटण्याची इच्छा आहे. आमच्या समस्या आम्ही त्यांना सांगू शकतो' असं मंगल आणि त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलं होतं. त्यानंतर मोदींनी त्यांची भेट घेतली आहे. 'आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लग्नाचं निमंत्रण पाठवलं होतं. 8 फेब्रुवारी रोजी आम्हाला पंतप्रधानांकडून शुभेच्छांचं एक पत्र आलं. हे पत्र पाहून आम्ही खूपच जास्त खूश झालो आहोत. नरेंद्र मोदी देशातील सर्व सामान्य लोकांची काळजी घेतात, विचार करतात याचं हे पत्र पुरावा आहे' अशी माहिती मंगल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेना बदलली?... 'नाणार'च्या सामनातील जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचं 'रोखठोक' विधान

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याचे आदेश

राजस्थानमध्ये 85 मोरांचा संशयास्पद मृत्यू, पक्षीमित्रांकडून हळहळ

China Coronavirus : धक्कादायक! चीनच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती?

१२वीची परीक्षा आजपासून; विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट

 

Web Title: PM Narendra Modi met rikshaw puller mangal kewat who invited pm for his daughters marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.