At Least 85 Peacocks Found Dead In Rajasthan | राजस्थानमध्ये 85 मोरांचा संशयास्पद मृत्यू, पक्षीमित्रांकडून हळहळ

राजस्थानमध्ये 85 मोरांचा संशयास्पद मृत्यू, पक्षीमित्रांकडून हळहळ

ठळक मुद्देराजस्थानमध्ये तब्बल 85 मोरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत. सर्व मृत मोर वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

नागौर - राजस्थानमध्ये तब्बल 85 मोरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या नागौरमध्ये तब्बल 85 मोर मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोरांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागौरमध्ये मोरांची संख्या जास्त आहे. मात्र अचानक मोरांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी वन विभागाला तातडीने याबाबत माहिती दिली. पक्षीमित्रांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत. सर्व मृत मोर वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मृत्यू होण्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाहीत. त्यामुळेच तपासणी करण्यात येत आहे. 'मोरांच्या मृत्यूची माहिती मिळताच मोरांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात  पाठवण्यात आले आहे. तपासणी अहवालानंतरच मोरांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल' अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

काही महिन्यांपूर्वी राजस्थानच्या जयपूरमध्ये असलेल्या सांभर तलावात हजारो पक्ष्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या भागात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. काही स्थलांतरीत पक्षीही दरवर्षी सांभार तलावात येत असतात. मात्र पक्ष्यांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली होती. जवळपास पाच ते आठ हजार पक्ष्यांचा संशयास्पद मृत्यू झालाचा दावा स्थानिक लोकांनी केला होता. मात्र प्रशासनाने 1000 पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. नॉदर्न शावलर, पिनटेल, कॉनम टील, रूडी शेल डक, कॉमन कूट गेडवाल, रफ, ब्लैक हेडड गल, ग्रीन बी ईटर, ब्लॅक शेल्डर काइट, कॅसपियन गल, ब्लॅक विंग्ड स्टील्ट, सेंड पाइपर, मार्श सेंड पाइपर, कॉमस सेंड पाइपर, वुड सेंड पाइपर पाइड ऐबोसिट, केंटिस प्लोवर, लिटिल रिंग्स प्लोवर, लेसर सेंड प्लोवर या पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

China Coronavirus : धक्कादायक! चीनच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती?

१२वीची परीक्षा आजपासून; विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट

एसआयटी चौकशीसाठी कायदेविषयक सल्ला घेणार

नाणार येणार..? 'सामना'ला जाहिरात, नाणारचे फायदे अन् महत्व सांगितले

 

Web Title: At Least 85 Peacocks Found Dead In Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.