१२वीची परीक्षा आजपासून; विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 06:14 AM2020-02-18T06:14:50+5:302020-02-18T06:15:29+5:30

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत

8th Examination from today; Students are all the best | १२वीची परीक्षा आजपासून; विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट

१२वीची परीक्षा आजपासून; विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट

Next

पुणे : बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू होणार असून, राज्यातील १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ३ हजार ७२१ वाढ झाली आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ३ हजार ३६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यासाठी ९,९२३ कनिष्ठ महाविद्यालयांतील ८ लाख ४३ हजार ५५२ मुलांनी तर ६ लाख ६१ हजार ३२५ मुलींनी नोंदणी केली आहे. विज्ञान शाखेच्या ५ लाख ८५ हजार ७३६ ,वाणिज्य शाखेच्या ४ लाख ७५ हजार १३४ तर कला शाखेच्या ३ लाख ८६ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम घेऊन बारावीची परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांची संख्या ५६ हजार ३७३ आहे.

विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास संबंधितांना विभागीय मंडळातर्फे हेल्पलाईनद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे.
मुंबई : ०२२-२७८८१०७५/२७८९३७५६, कोकण : ०२३५२-२२८४८०

Web Title: 8th Examination from today; Students are all the best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.