PM Narendra Modi Interview: “निवडणुकांच्या ५ राज्यांत भाजपचीच लाट; प्रचंड बहुमताने आमची सत्ता स्थापन होईल”: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 20:26 IST2022-02-09T20:25:59+5:302022-02-09T20:26:42+5:30
PM Narendra Modi Interview: निवडणुका असलेल्या पाच राज्यातील जनता भाजपला सेवेची संधी देईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

PM Narendra Modi Interview: “निवडणुकांच्या ५ राज्यांत भाजपचीच लाट; प्रचंड बहुमताने आमची सत्ता स्थापन होईल”: पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली: देशभरातील पाचही राज्यांत विधानसभा निवडणुका असून, राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी निवडणुका असलेल्या पाचही राज्यांत भाजपचीच लाट असून, जनता आम्हाला सेवा करण्याची संधी देईल. या पाचही राज्यांत भाजपची सत्ता येईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान मोदी बोलत होते. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपला मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना करावा लागला आहे. पराभवाची चव चाखतच भाजप या ठिकाणी येऊन पोहोचली आहे. भाजपने जेवढा मोठा पराजय पाहिला आहे, तेवढाच मोठा विजयही पाहिला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
देशातील निवडणुकांच्या पाचही राज्यात भाजपचीच लाट
आताच्या घडीला देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. या राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यास या प्रत्येक ठिकाणी भाजपची लाट असल्याचे पाहायला मिळत आहे. या राज्यांमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळेल. या पाच राज्यातील जनता भाजपला सेवेची संधी देईल. ज्या राज्यातील जनतेची सेवा करण्याची आम्हाला मिळाली, तेथे जनतेने आमचे काम पाहिले आहे. त्यामुळे तेथेही पुन्हा एकदा आमची सत्ता स्थापन होईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
निवडणुकीत पराभव झाल्यावर मिठाईदेखील वाटली
आम्ही अनेक पराभव पाहिले आहेत. डिपॉझिट जप्त होताना पाहिले आहे. एकदा जनसंघाच्या वेळी निवडणुकीत पराभव झाल्यावर मिठाईदेखील वाटली जात होती. त्यावेळी मिठाई का वाटली जात आहे असा प्रश्न आम्ही केला. त्यावेळी तुमच्या तीन जणांचे डिपॉझिट वाचले असे आम्हाला उत्तर देण्यात आले, अशी एक आठवण पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितली.
दरम्यान, उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात निवडणुका होणार असून, १० मार्च रोजी एकत्रितपणे मतमोजणी आहे. १० फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशमधील पहिल्या टप्प्याच्या मतदानापासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
मैं इस चुनाव में सभी राज्यों में देख रहा हूं कि भाजपा के प्रति लहर है, भारी बहुमत से भाजपा जीतेगी। हमें सेवा का मौका इन सभी 5 राज्यों की जनता देगी। जिन राज्यों ने हमें सेवा का मौका मिला है उन्होंने हमें परखा है, हमारे काम को देखा है: ANI से बात करते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी pic.twitter.com/GSKJAdfIpX
— ANI_HindiNews (@AHindinews) February 9, 2022