राम मंदिराला होणाऱ्या विलंबासाठी काँग्रेसच कारणीभूत, नरेंद्र मोदींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 16:55 IST2018-11-25T16:54:24+5:302018-11-25T16:55:14+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अलवर येथे झालेल्या सभेत राम मंदिराप्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत काँग्रेसकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला.

PM Narendra Modi in Alwar | राम मंदिराला होणाऱ्या विलंबासाठी काँग्रेसच कारणीभूत, नरेंद्र मोदींचा आरोप

राम मंदिराला होणाऱ्या विलंबासाठी काँग्रेसच कारणीभूत, नरेंद्र मोदींचा आरोप

अलवर ( राजस्थान) - राम मंदिराच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सध्या अयोध्येतील आणि देशातील वातावरण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अलवर येथे झालेल्या सभेत राम मंदिराप्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत काँग्रेसकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला. तसेच काँग्रेस नेत्यांनीच सर्वोच्च न्यायालयामध्ये राम मंदिराची सुनावणी टाळण्याची अपील केली होती, असाही आरोप मोदींनी केला. 

अलवर येथील रॅलीमध्ये मोदी म्हणाले, अयोध्येचा खटला सुरू होता तेव्हा काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा सदस्य म्हणाले की, राम मंदिराचा खटला २०१९ पर्यंत चालवू नका, कारण २०१९ मध्ये निवडणुका आहेत. देशातील न्यायव्यवस्थेला अशा प्रकारच्या राजकारणामध्ये योग्य आहे का?" असा सवालही मोदींनी केला. 





'' सर्वोच्च न्यायालयाचे कुठलेही न्यायाधीश अयोध्येसारख्या गंभीर आणि संवेदनशील  प्रकरणी न्यायदान करण्याच्या दिशेने सर्वांचे मत ऐकूण घेण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा काँग्रेसचे राज्यसभेमधील एक खासदार आणि वकीलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोग आणून त्यांना घाबरवले होते. आता काँग्रेसवाल्यांनी न्यायमूर्तींना घाबरवण्याचे- धमकावण्याचे काम सुरू केले आहे," असा आरोपही मोदींनी केला. 

तसेच काँग्रेसकडे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची हिंमत नाही. त्यामुळे त्यांनी मोदींच्या जातीचा मुद्दा समोर आणला आहे, असा आरोपही मोदींनी केली.

Web Title: PM Narendra Modi in Alwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.