शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

India China Face Off: पंतप्रधान मोदींची सर्वपक्षीय बैठक आज; जाणून घ्या, कोण होणार सहभागी, कुणाला निमंत्रण नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 09:18 IST

या बैठकीत, चीनसोत सुरू असलेला वाद आणि सद्य स्थितीवर चर्चा होणार आहे. ही बैठक सायंकाळी पाच वाजता व्हर्च्युअल (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) पद्धतीने होईल. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते या बैठकीत सहभागी  होणार आहेत.

ठळक मुद्देभारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत भारताचाच्या 20 जवानांना हौतात्म्य आले.यात चीनचे 35 जवान मारेल गेले असल्याचा दावा अमेरिकन गुप्तचर संस्थेने केला आहे.या बैठकीत, चीनसोत सुरू असलेला वाद आणि सद्य स्थितीवर चर्चा होणार आहे.

नवी दिल्ली : भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत भारताचाच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. यानंतर संपूर्ण देशात चीन विरोधात संतापाचे वातावरण असून चीनला चोख उत्तर द्यावे, असा सूर उमटत आहे. याच मुद्द्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यात राजकीय पक्षांचे अध्यक्ष सहभागी होणार आहेत.

या बैठकीत, चीनसोत सुरू असलेला वाद आणि सद्य स्थितीवर चर्चा होणार आहे. ही बैठक सायंकाळी पाच वाजता व्हर्च्युअल (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) पद्धतीने होईल. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते या बैठकीत सहभागी  होणार आहेत. मात्र काही राजकीय पक्षांना या बैठकीचे निमंत्रण मिळालेले नाही. यामुळे वादही उत्तपन्न होण्याची शक्यता आहे.

India China Faceoff : हिंसक झटापटीत चीनचे 35 सैनिक ठार, अमेरिकन गुप्तचर संस्थेचा दावा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीपूर्वी सर्व महत्वांच्या पक्षांच्या अध्यक्षांशी फोनवरून चर्चा केली. या बैठकीत एकूण 16 राजकीय पक्ष सहभागी होणार आहेत.

या बैठकीत, सोनिया गांधी, एमके स्टालिन, एन. चंद्रबाबू नायडू, जगन रेड्डी, शरद पवार, नीतीश कुमार, डी. राजा, सीताराम येचुरी, नवीन पटनायक, के. चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, सुखबीर बादल, चिराग पासवान, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव आणि हेमंत सोरेन आदी नेते सहभागी होऊ शकतात.

गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO 

अनेक राजकीय पक्षांना न बोलावल्याने होऊ शकतो वाद -पंतप्रधानांनी बोलावलेल्या या बैठकीपूर्वीच वादाला तोंड फुटले आहे. आम आदमी पार्टीकडून आरोप करण्यात आला आहे, की त्यांचे चार खासदार आहेत. राज्यसभेतही प्रतिनिधी आहेत. असे असतानाही त्यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. तसेच राष्ट्रीय जनता दलालाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे तेजस्वी यादव यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या पक्षांच्या लोकसभेत पाच अथवा त्याहून अधिक जागा आहेत, केवळ त्यांनाच या बैठकीत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, टीडीपीचे चार खासदार असतानाही त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कारण

15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्याजवळ भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत चकमक झाली. यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. तर चीनचेही मोठे नुकसान झाले. यात चीनचे 35 जवान मारेल गेले असल्याचा दावा अमेरिकन गुप्तचर संस्थेने केला आहे.

या घटनेनंतर देशात संतापाचे वातावरण आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह देशातील अनेक विरोधीपक्ष नेत्यांनी यासंदर्भात सरकारकडे चीनला चोख उत्तर देण्याची मागणी केली आहे. 

पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले आहेत 'आमने-सामने'

टॅग्स :border disputeसीमा वादNarendra Modiनरेंद्र मोदीSonia Gandhiसोनिया गांधीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना