शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:17 IST

PM Modi Varanasi: लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या 14 महिन्यानंतर वाराणसीत काँग्रेस नेते अजय राय यांच्या नावाने जल्लोष करण्यात आला.

PM Modi Varanasi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपावरुन केंद्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर पीएम नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये अनोखा निषेध पाहायला मिळाला. मोदींविरोधात निवडणूक लढवणारे यूपी काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांच्या निवासस्थानी समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते गुलाबाची फुले, हार आणि मिठाई घेऊन पोहोचले. 'वाराणसीचे खासदार कोण, अजय राय..अजय राय'! अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. वातावरण असे झाले, जणू काय अजय राज निवडून आले आहेत.

लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. परंतु मतचोरीच्या आरोपावरुन काँग्रेसने भाजप सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. वाराणसीमध्ये तर अजय राय यांनाच वाराणसीचे 'खरे खासदार' मानून समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. वाराणसीच्या लोकांनी अजय राय यांनाच विजयी केले होते, मात्र प्रशासकीय हेराफेरीमुळे निकाल उलटला, असा दावा सपाच्या कार्यकर्त्यांचा यावेळी केला.

समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते जेव्हा घरी पोहोचले, तेव्हा अजय राय यांनीदेखील हसतमुखाने त्यांचे स्वाग केले. तसेच, कार्यकर्त्यांनी आणलेले हार-फूल आणि मिठाई स्विकारली. माझ्यावर विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या साडेचार लाख मतदारांचा मी ऋणी आहे. काशीच्या लोकांनी दिलेले प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासाठी अमूल्य आहे, अशी प्रतिक्रिया अजय राय यांनी यावेळी दिली. 

सपा कार्यकर्त्यांचे आरोपअजय राय यांच्या घरी पोहोचलेले सपा कार्यकर्ते अमन यादव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, वाराणसीच्या लोकांनी अजय राय यांना विजयी केले होते, परंतु सरकारी यंत्रणेच्या मदतीने निकाल बदलला गेला. अजय राय इंडिया आघाडीचे उमेदवार होते, तेच आमच्यासाठी खरे खासदार आहेत, असा दावा यादव यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Varanasiवाराणसीcongressकाँग्रेस