आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पहिल्या आरोग्य केंद्राचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 04:05 PM2018-04-14T16:05:59+5:302018-04-14T16:05:59+5:30

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पहिल्या आरोग्यसेवा केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (14 एप्रिल) केले.

PM Modi rolls out Ayushman Bharat scheme, inaugurates first health centre | आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पहिल्या आरोग्य केंद्राचे उद्घाटन

आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पहिल्या आरोग्य केंद्राचे उद्घाटन

Next

रायपूर- आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पहिल्या आरोग्यसेवा केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (14 एप्रिल) केले. या योजनेंतर्गत पहिले आरोग्य केंद्र मिळवण्याचा मान छत्तीसगडला मिळाला असून या राज्यातील बिजापूर येथे या केंद्राच्या कामाला सुरुवात झाली आहे. आयुष्यमान भारत योजना ही केवळ आरोग्यसेवा देण्यापुरती सीमित नाही तर आरोग्यपूर्ण, ताकदवान असा नव्या भारताच्या निर्मितीसाठी लोकांना समाविष्ट करुन घेण्यासाठी आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या शुभारंभानंतर केले.

आयुष्यमान भारत ही योजना राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना म्हणूनही ओळखली जाते. या योजनेची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सर्व स्तरातील प्राथमिक आरोग्यसेवा मिळण्यासाठी प्रयत्न करणे आणि देशाच्या 40 टक्के लोकसंख्येला विम्याचे संरक्षण देणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. आजवर आरोग्यसेवांपासून दुर्लक्षित राहिलेल्या लोकांना या योजनेचा लाभ मिळावा असा त्यामागे उद्देश आहे. ही योजना 10 लाख गरिब कुटुंबांना 5 लाखांपर्यंत दुय्यम आणि तृतीय रुग्णालय सेवांसाठी संरक्षण उपलब्ध करुन देणार आहे. केंद्र सरकारच्या कॅबिनेटकडून 10,500 कोटी रुपयांच्या या योजनेला 21 मार्च रोजी मान्यता मिळाली होती.

आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिजापूर जिल्ह्यात जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. या जिल्ह्यात निर्माण गुडुम ते भानूप्रतापूर या नव्या रेल्वेमार्गाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला. या वर्षाच्या अखेरीस छत्तीसगडमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भेटीला विशेष महत्त्व आहे. छत्तीसगडला त्यांनी पंतप्रधान झाल्यानंतर दिलेली ही चौथी भेट आहे. रस्ते आणि पुल बांधण्याच्या विविध 1700 कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तसेच बस्तरमध्ये इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी 40 हजार किमीचे फायबर ऑप्टीक्स केबलचे जाळे पसरवण्यात येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटनही त्यांनी केले.



 



 

Web Title: PM Modi rolls out Ayushman Bharat scheme, inaugurates first health centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.