PM Modi Interview Live : मी त्या व्यक्तीला कसं उत्तर देऊ जो ऐकतच नाही?; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 20:56 IST2022-02-09T20:55:28+5:302022-02-09T20:56:06+5:30
मी आणि आमचं सरकार कोणावरही निशाणा साधत नाही, आम्ही चर्चेवर विश्वास ठेवतो : पंतप्रधान

PM Modi Interview Live : मी त्या व्यक्तीला कसं उत्तर देऊ जो ऐकतच नाही?; पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींना टोला
PM Modi Interview Live : भारत-चीन सीमा वाद आणि वाढती बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण न दिल्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे. "संबंधित मंत्रालयांद्वारे विस्तृत स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. जेव्हा गरज होती तेव्हा आम्हीदेखील काही विषयांवर बोलत होतो," असं मोदी म्हणाले. एनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत, ना ते कोणाचं ऐकतात ना ते सभागृहात बसतात असं वक्तव्य केलं.
"संसदेत आम्ही चर्चेचं स्वागत करतो. मी आणि आमचं सरकार कोणावरही निशाणा साधत नाही, आम्ही चर्चेवर विश्वास ठेवतो. कोणावर निशाणा साधण्याची भाषा मी जाणत नाही आणि हे माझ्या स्वभावातही नाही. परंतु तर्क आणि तथ्यांच्या आधारावर माध्यमं काही वाद भडकावण्यासाठी सभागृहात माझ्या शब्दांची व्याख्या करू शकतात," असं मोदी म्हणाले.
#WATCH | Prime Minister Narendra Modi's interview with ANI’s Smita Prakash https://t.co/QIf9FrKkpo
— ANI (@ANI) February 9, 2022
आमचा चर्चेवर विश्वास
"आम्ही कोणावर हल्लाबोल करत नाही. याशिवाय आम्ही चर्चेवर विश्वास ठेवतो. अनेकदा वाद, टीका या होतात. मी त्याचं स्वागत करतो आणि यासाठीच माझ्याकडे नाराज होण्याचं कोणतंही कारण नाही. मी प्रत्येक विषयावर तथ्य सादर केली आहेत आणि त्यावरच चर्चा केली आहे. काही विषयांवर परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयानं विस्तृत उत्तरं दिली आहेत आणि आवश्यकता आहे तिकडे मीदेखील उत्तर दिलंय. जो ऐकतच नाही आणि संसदेत बसतच नाही? त्याचं उत्तर मी कसं देणार," असंही ते म्हणाले.