'जुन्या इमारती गुलामगिरीच्या प्रतीक होत्या', पीएम मोदींनी केले सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 19:37 IST2026-02-13T19:35:46+5:302026-02-13T19:37:52+5:30
PM Modi Inaugurates Seva Teerth: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नवीन PMO ‘सेवा तीर्थ’ आणि कर्तव्य भवन-1, 2 चे उद्घाटन केले.

'जुन्या इमारती गुलामगिरीच्या प्रतीक होत्या', पीएम मोदींनी केले सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनचे उद्घाटन
PM Narendra Modi Inaugurates Seva Teerth: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(दि.13) राजधानी दिल्लीतील नवीन PMO ‘सेवा तीर्थ’, तसेच कर्तव्य भवन-1 आणि कर्तव्य भवन-2 या प्रशासकीय संकुलांचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी हा क्षण भारताच्या विकास यात्रेतील नवा अध्याय असल्याचे सांगत, गुलामीच्या प्रतीकांपासून मुक्त होत देश नव्या इतिहासाची निर्मिती करत असल्याचे अधोरेखित केले.
Delhi: PM Narendra Modi says, "The capital of the country, which became independent in 1947 and from where major decisions were made, was completely bound by the mindset of slavery. Delhi’s buildings, public spaces, and historical sites were filled with symbols of colonial rule.… pic.twitter.com/2UUGjGhMcr
— IANS (@ians_india) February 13, 2026
इतिहास घडताना आपण पाहतोय- पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, आपण आज इतिहास घडताना पाहत आहोत. साउथ ब्लॉक हा ब्रिटिश राजवटीचे प्रतीक होता. आता गुलामीची चिन्हे दूर केली जात आहेत. राजपथ आज कर्तव्य पथ म्हणून ओळखला जातो. मुघल गार्डनचे ‘अमृत उद्यान’ झाले, तर जुन्या संसद भवनाचे ‘संविधान भवन’ नामकरण करण्यात आले.
जुने PMO, नॉर्थ-साउथ ब्लॉकवर भाष्य
पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, नॉर्थ ब्लॉक आणि साउथ ब्लॉक या इमारती ब्रिटिश साम्राज्याच्या मानसिकतेचे प्रतीक होत्या. ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर याच इमारतींमधून देशासाठी महत्त्वाचे निर्णय झाले, धोरणे आखली गेली. पण या इमारती भारताला गुलामीच्या जाळ्यात ठेवण्यासाठी उभारल्या गेल्या होत्या. आज हा दिवस भारताच्या विकास यात्रेत नव्या सुरुवातीचा साक्षीदार ठरत आहे.
Delhi: PM Narendra Modi says, "Seva Teerth is not just a name; it is a resolve. Seva Teerth is a place sanctified through the service of the citizens, a place where the commitment to service is taken to its highest fulfillment. The goal is a self-reliant India. We must lift… pic.twitter.com/EV2D4wF87Y
— IANS (@ians_india) February 13, 2026
‘विकसित भारत’च्या संकल्पासह नवा प्रवेश
पंतप्रधान मोदींनी सांगितले की, आज आपण ‘विकसित भारत’च्या संकल्पासह सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनात प्रवेश करत आहोत. ईश्वरी आशीर्वादामुळे आपली उद्दिष्टे साध्य करण्याची ताकद आपल्याला मिळत आहे. विक्रम संवत 2082, फाल्गुन कृष्ण पक्षातील विजया एकादशीच्या शुभमुहूर्तावर हा कार्यक्रम झाल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, शास्त्रांनुसार या दिवशी घेतलेला संकल्प विजयाकडे घेऊन जातो. आज भारत रिफॉर्म एक्सप्रेसवर स्वार आहे; नवे व्यापार करार संधींची दारे उघडत आहेत. अशा वेळी सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन देशाच्या उद्दिष्टपूर्तीत मोठी भूमिका बजावतील.
Delhi: PM Narendra Modi says, "The new Prime Minister’s Office is named Seva Teerth. The spirit of service is the soul of India. The spirit of service is India’s true identity... Our scriptures also say that 'Seva Parmo Dharma', service is the highest duty. In other words,… pic.twitter.com/GTgKqQyDSC
— IANS (@ians_india) February 13, 2026
नॉर्थ-साउथ ब्लॉक होणार संग्रहालय
या बदलांदरम्यान जुन्या इमारतींचे ऐतिहासिक महत्त्व जपले जाईल, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, जुन्या इमारतींमध्ये घेतलेले निर्णय आणि त्या परिसरातील आठवणी कायम राहतील. त्यामुळे नॉर्थ आणि साउथ ब्लॉकचे रूपांतर राष्ट्रीय संग्रहालयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
Delhi: PM Narendra Modi says, "For a long time, our capital did not have a proper space to honor the memory of our great heroes. We decided that the new generation of India’s capital should draw inspiration from our heroes. Changes were also made in the Rashtrapati Bhavan campus.… pic.twitter.com/ppfuuAXLhq
— IANS (@ians_india) February 13, 2026
‘सेवा तीर्थ’, नव्या प्रशासकीय युगाची ओळख
‘सेवा तीर्थ’चा अर्थ सेवेचे स्थान असा असून, याचे आधीचे नाव ‘एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह’ होते. 2 डिसेंबर 2025 रोजी त्याचे नामकरण ‘सेवा तीर्थ’ असे करण्यात आले. हे संकुल नवी दिल्लीतील दारा शिकोह रोड परिसरात आहे.
कर्तव्य भवन-1 आणि 2 मध्ये कोणती मंत्रालये?
- वित्त मंत्रालय
- संरक्षण मंत्रालय
- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
- कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय
- शिक्षण मंत्रालय
- संस्कृती मंत्रालय
- विधी व न्याय मंत्रालय
- माहिती व प्रसारण मंत्रालय
- कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
- रसायन व खत मंत्रालय
- जनजातीय कार्य मंत्रालय