तुमकूर(कर्नाटक)- पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारपासून दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. सिद्धगंगा मठानंतर त्यांनी तुमकूरमध्ये एका जनसभेला संबोधित केलं आहे. त्यांनी विविध राज्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्मण अवॉर्ड दिले आहेत. आज 8 कोटी शेतकऱ्यांजवळ सन्मान निधी पोहोचला आहे. नव्या वर्षात, नव्या दशकाच्या सुरुवातीलाच अन्नदात्या शेतकरी भावा-बहिणीचं दर्शन झालं, हे माझं भाग्य आहे. 130 कोटी देशवासीयांच्या वतीनं भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला नववर्षांच्या शुभेच्छा देतो, असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. कृषी कर्मण पुरस्काराबरोबरच आज कर्नाटकाच्या धरतीवर आणखी एका इतिहासाची नोंद झाली आहे. या कार्यक्रमातच फक्त देशातील 6 कोटी शेतकरी कुटुंबीयांच्या खात्यात 12 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. देशात एक असा काळ होता ज्यावेळी गरिबांना 1 रुपया पाठवल्यावर फक्त 15 पैसे पोहोचत होते. इतर 85 पैसे मधलेच खात होते. आज जेवढे पैसे आपण पाठवतो आहोत, ते पूर्णतः शेतकऱ्यांच्या खात्यात जात आहेत.
8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला सन्मान निधी- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 17:25 IST