PM Modi Birthday: वाढदिवसानिमित्त राहुल गांधींनी PM मोदींना दिल्या अशा शुभेच्छा, CM केजरीवालांनीही केलं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 10:33 IST2022-09-17T10:30:39+5:302022-09-17T10:33:04+5:30

"आपल्याहातून अतुलनीय परिश्रम, कर्तव्यनिष्ठा आणि सर्जनशीलतेने होत असलेले राष्ट्र निर्मितीचे कार्य, आपल्याच नेतृत्वात पुढे चालत राहावे. हीच मनोकामना. ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देओ, अशा शुभेच्छा."

PM Modi birthday Rahul Gandhi and Arvind Kejriwal wish birthday | PM Modi Birthday: वाढदिवसानिमित्त राहुल गांधींनी PM मोदींना दिल्या अशा शुभेच्छा, CM केजरीवालांनीही केलं ट्विट

PM Modi Birthday: वाढदिवसानिमित्त राहुल गांधींनी PM मोदींना दिल्या अशा शुभेच्छा, CM केजरीवालांनीही केलं ट्विट

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून ते 72 वर्षांचे झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव केवळ देशातीलच नव्हे, तर जगातील आघाडींच्या नेत्यांमध्येही सामील आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देश आणि जगभरातील सर्वच नेते त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्याचा वाढदिवस ट्विटरवर ट्रेंड करत आहे. दरम्यान, भाजप नेत्यांबरोबरच विरोधी पक्षांचे नेतेही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

राहुल गांधींनी दिल्या शुभेच्छा - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधींसहकाँग्रेसच्या अनेक नेत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.' राहुल गांधी हे सध्या केरलमधील करुणागापल्ली येथे आहेत. आज काँग्रेसच्या भारत जोडो अभियानाचा 9वा दिवस आहे.

CM केजरीवाल यांनीही केले ट्विट - 
राहुल गांधींशिवाय, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही PM मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायष्यासाठी प्रार्थना,' असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.

राष्ट्रपती मुर्मू यांनीही दिल्या शुभेच्छा -
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विट करत त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याहातून अतुलनीय परिश्रम, कर्तव्यनिष्ठा आणि सर्जनशीलतेने होत असलेले राष्ट्र निर्मितीचे कार्य, आपल्याच नेतृत्वात पुढे चालत राहावे. हीच मनोकामना. ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देओ, अशा शुभेच्छा.'

 

Web Title: PM Modi birthday Rahul Gandhi and Arvind Kejriwal wish birthday