PM Kisan: ठरलं! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' तारखेला जमा होणार 2 हजार रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 12:06 PM2022-09-01T12:06:11+5:302022-09-01T12:07:04+5:30

PM Kisan 12th Instalment : सरकारकडून निश्चित करण्यात आलेली ई-केवायसीची अंतिम मुदतही संपली आहे.

pm kisan yojana 12th instalment will credit on 5th september | PM Kisan: ठरलं! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' तारखेला जमा होणार 2 हजार रुपये 

PM Kisan: ठरलं! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' तारखेला जमा होणार 2 हजार रुपये 

googlenewsNext

नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Samman Nidhi) 12 व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. या हप्त्यातील दोन हजार रुपये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायचे आहेत. 

सरकारकडून निश्चित करण्यात आलेली ई-केवायसीची अंतिम मुदतही संपली आहे. अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी 31 ऑगस्टपर्यंत झालेली नाही. पीएम किसान योजनेची माहिती देताना प्रधान सचिव डॉ. अरुण कुमार मेहता (Dr Arun Kumar Mehta) म्हणाले की, 12 वा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक केलेल्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल. 

तसेच, 5 सप्टेंबरपर्यंत योजनेशी संबंधित रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर होणे अपेक्षित आहे, असेही डॉ. अरुण कुमार मेहता यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी सरकारचे मुख्य लक्ष अपात्र लाभार्थ्यांना दिले जाणारे लाभ थांबवणे आणि पैसे वसूल करणे हा आहे.

शेतकऱ्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात, जे 2-2 हजाराच्या तीन हप्त्यांमध्ये उपलब्ध आहेत. ई-केवायसी पूर्ण झाल्याशिवाय हप्ता दिला जाणार नाही, असे सरकारकडून यापूर्वी सांगण्यात आले होते.

केंद्र सरकारने जेव्हापासून या योजनेसाठी ई-केवायसी आवश्यक केले आहे, तेव्हापासून या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर 2021 दरम्यान 11.19 कोटी शेतकऱ्यांना 9 वा हप्ता मिळाला. 

त्यानंतर डिसेंबर 2021 ते मार्च 2022 दरम्यान जवळपास 11.15 कोटी शेतकऱ्यांना 10 वा हप्ता मिळाला. 11 व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या 10.92 कोटींवर आली आहे.

Web Title: pm kisan yojana 12th instalment will credit on 5th september

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.