शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

प्लीज ‘नोट’ : आजपासून नोटांसाठी पुन्हा नवे नियम!

By admin | Updated: November 18, 2016 07:03 IST

हजार-पाचशेच्या जुन्या नोटा बंद करण्याच्या निर्णयांतर आलेल्या नवनव्या नियमांनी सर्वसामान्य जनता अगोदरच संभ्रमात असताना आता

नवी दिल्ली : हजार-पाचशेच्या जुन्या नोटा बंद करण्याच्या निर्णयांतर आलेल्या नवनव्या नियमांनी सर्वसामान्य जनता अगोदरच संभ्रमात असताना आता गुरुवारी केंद्र सरकारने आणखीन भर घातली आहे. त्यामुळे व्यवहार सुरळीत सुरू ठेवणे सर्वांनाच अवघड होत आहे. बँकेतून ४५00 हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळवताना लोकांचे हाल होत असले आणि तेवढी रक्कम आठवडाभर पुरत नसली तरी आता बँकेतून केवळ २ हजार रुपयेच दिले जातील, असे जाहीर करण्यात आले. १८ नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी दिली. मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या रकमेतून आठवड्याला २५ हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे आणि पीक विम्याचा हप्ता भरण्याची मुदत १५ दिवसांनी वाढवून दिली आहे.यापूर्वी प्रत्येक व्यक्तीला बँकेतून ४,५०० रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून मिळतील, असे सरकारने सांगितले होते. प्रत्यक्षात काही बँका ४ हजार तर काही बँका २ हजार रुपयेच ग्राहकांना देत होत्या. ही रक्कम आता २ हजार रुपयेच करण्यात आली आहे. अधिकाधिक लोकांना नोटा बदलता याव्यात हाच यामागील उद्देश आहे, असे कारण अर्थ सचिवांनी पुढे केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) कृषी उत्पन्न बाजारपेठेतील नोंदणीकृत व्यापारी आणि अडते यांना आठवड्यातून एकदा आपल्या खात्यातून ५0 हजार रुपये काढता येतील.रब्बीच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना खते, औषधे आदींची खरेदी करता यावी, यासाठी त्यांना कर्ज खात्यातून आठवड्यातून २५ हजार रुपये काढता येतील. कृषी उत्पादन बाजारात विकल्याने आरटीजीएसने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या रकमेतून दर आठवड्याला २५ हजार रुपये शेतकऱ्यांना काढता येतील.